Maharashtra Budget 2026: काय स्वस्त, काय झालं महाग?, CM फडणवीसांनी मांडलेल्या बजेटमधून महाराष्ट्राला काय मिळालं?
Maharashtra Assembly Budget 2026-2027: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच या अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त आणि काय महाग होणार याची संपूर्ण यादी पाहूया.
ADVERTISEMENT

Maharashtra Assembly Budget 2026-2027: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (6 मार्च) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसह काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसंच आता या अर्थसंकल्पानंतर नेमकं काय स्वस्त आणि काय महाग होणार हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (maharashtra budget 2026 cm devendra fadnavis announce budget what became cheaper what became more expensive see full list)
काय स्वस्त
- मोटर वाहन करात 30 टक्के सूट
- पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी
- नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजारांची मदत
अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा
- राज्यातून जास्तीत जास्त खेळाडूनी सहभाग नोंदवावा यासाठी 8 हाय परफॉरमेंस केंद्र सुरू असून चार प्रशिक्षण केंद्र सुरू केली जाणार आहेत.
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुदान अकादमी स्थापन करणार आहे. राज्यात आरोग्य संस्थाची बळकटी करण्यासाठी निधी दिला जाणार आहे. राज्यात भाषा कला क्रीडा आणि सांस्कृतिक वारस्याचे जतन करण्याचे उद्दिष्ट आहे.
- नाशिक येथे सिहस्थ कुंभमेळा आयोजन केले जाणार आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सातारा येथे शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाचे जतन करण्यात येईल










