मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ठाकरेंच्या आमदाराची संपत्तीच काढली, काढलेल्या कर्जाचा आकडाही सांगितला! नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Devendra Fadnvais on Sunil Prabhu :  देवेंद्र फडणवीस म्हणाले, "प्रभू साहेब मी तुमचे निवडणुकीचे अॅफिडेविट तपासले. तुमच्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती 14 कोटी आणि कर्ज 3.54 लाख रुपये असल्याचे नमूद केले आहे. कर्जाचा विचार केल्यास तुमच्यावर 25.28 टक्के दायित्व आहे. एवढ्या दायित्वामुळे तुम्ही कर्जबाजारी होणार का? तुम्हाला नादारी घोषित करावी लागणार का? हे शक्यच नाही. प्रभू यांना एवढ्याशा कर्जामुळे नादारी घोषित करावी लागणार नाही. त्याचप्रमाणे राज्यावर 18 टक्केच कर्ज आहे. त्यामुळे प्रभू यांच्यापेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती थोडी उत्तम आहे."

ADVERTISEMENT

Devendra Fadnvais on Sunil Prabhu
Devendra Fadnvais on Sunil Prabhu
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ठाकरेंच्या आमदाराची संपत्तीच काढली

point

काढलेल्या कर्जाचा आकडाही सांगितला! नेमकं काय घडलं?

Devendra Fadnvais on Sunil Prabhu : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना विरोधकांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. विशेषतः शिवसेना (ठाकरे) गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी राज्याच्या वाढत्या कर्जाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक उदाहरणाद्वारे प्रत्युत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानभेत थेट सुनील प्रभुंच्या संपत्तीचा आकडा सांगितला. देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात... 

देवेंद्र फडणवीसांनी सुनील प्रभूंच्या संपत्तीचा आकडा सांगितला 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "प्रभू साहेब मी तुमचे निवडणुकीचे अॅफिडेविट तपासले. तुमच्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती 14 कोटी आणि कर्ज 3 कोटी 54 लाख रुपये असल्याचे नमूद केले आहे. कर्जाचा विचार केल्यास तुमच्यावर 25.28 टक्के दायित्व आहे. एवढ्या दायित्वामुळे तुम्ही कर्जबाजारी होणार का? तुम्हाला नादारी घोषित करावी लागणार का? हे शक्यच नाही. प्रभू यांना एवढ्याशा कर्जामुळे नादारी घोषित करावी लागणार नाही. त्याचप्रमाणे राज्यावर 18 टक्केच कर्ज आहे. त्यामुळे प्रभू यांच्यापेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती थोडी उत्तम आहे."

हेही वाचा : 'अहो, मला भजी खायची आहेत..', नवऱ्याला कॅन्टीनमध्ये पाठवलं, अन् नवविवाहिता इमरानसोबत पळून गेली!

राज्याच्या वाढत्या आर्थिक ताकदीचे विश्लेषण करताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची जागतिक स्तरावरील देशांशी तुलना केली. जर महाराष्ट्र एक स्वतंत्र देश असता, तर तो जगातील 30 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरला असता, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या आपण नॉर्वे, थायलंड, फिलिपिन्स आणि ऑस्ट्रिया यांसारख्या विकसित देशांना मागे टाकले असून, विकासाचा हाच वेग कायम राहिल्यास येत्या दोन ते तीन वर्षांत UAE आणि सिंगापूरसारख्या देशांच्या अर्थव्यवस्थांनाही महाराष्ट्र मागे टाकेल, असा दावा फडणवीस यांनी केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp