मनसेच्या वर्धापनदिनी रायगडावरुन नवी सुरुवात, सोशल मीडिया पोस्ट करत राज ठाकरेंची मोठी घोषणा

मुंबई तक

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या (9 मार्च) रोजी 20 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त मनसेने पक्षाची सदस्य नोंदणी मोहिम हाती घेतली आहे. उद्या या सदस्य नोंदणीची सुरुवात रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन राज ठाकरे स्वत:पासून करणार आहेत. यानंतर 10 मार्च पासून सर्वांसाठी पक्षाची नोंदणी सुरु होणार आहे. यानिमित्ताने समाजमाध्यमांवर पोस्ट करुन राज ठाकरेंनी ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे त्या सर्वांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

ADVERTISEMENT

raj thackeray
raj thackeray
google news

बातम्या हायलाइट

point

मनसेच्या वर्धापनदिनी रायगडावरुन नवी सुरुवात

point

सोशल मीडिया पोेस्ट करत राज ठाकरेंची मोठी घोषणा

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या (9 मार्च) रोजी 20 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त मनसेने पक्षाची सदस्य नोंदणी मोहिम हाती घेतली आहे. उद्या या सदस्य नोंदणीची सुरुवात रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन राज ठाकरे स्वत:पासून करणार आहेत. यानंतर 10 मार्च पासून सर्वांसाठी पक्षाची नोंदणी सुरु होणार आहे. यानिमित्ताने समाजमाध्यमांवर पोस्ट करुन राज ठाकरेंनी ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे त्या सर्वांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय, जाणून घेऊया.

हे ही वाचा : पैसा-पाणी: ChatGPT ला टक्कर देणारं Cloud आहे तरी काय?


राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी

आपल्या पक्षाचा उद्या, 9 मार्च 2026 ला 20 वा वर्धापनदिन. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापनदिन. या निमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी 20 मार्च 2026 पासून सुरु होत आहे. उद्या ९ मार्च ला मी सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहे. या रायगडाने महाराजांचं वास्तव्य अनुभवलंच पण 'शिवराज्याभिषेकाचा' साक्षीदार देखील हा किल्लाच. 

अशा पावन ठिकाणी जाऊन आपण आपली सदस्य नोंदणी सुरु करत आहोत. 

हे वाचलं का?