पैसा-पाणी: ChatGPT ला टक्कर देणारं Cloud आहे तरी काय?

ChatGPT आणि Claude या AI कंपन्यांमधील स्पर्धा ही तीव्र होत चालली आहे. जाणून घ्या याचविषयी पैसा-पाणी या विशेष सदरातून.

ADVERTISEMENT

paisa pani blog milind khandekar what is cloude competitor to chatgpt
पैसा-पाणी ब्लॉग
social share
google news

अमेरिकेतील App स्टोअरमध्ये एक मोठा उलटफेर झाला आहे. गेल्या आठवड्यात Cloud सर्वात जास्त डाउनलोड होणारे App बनलं आहे, तर ChatGPT खाली आलं आहे. हा बदल कसा घडला? त्यामागील कहाणी आपण पैसा-पाणी या विशेष सदरातून समजून घेऊया.

Anthropic ने सरकारला 'नाही' म्हटले

Anthropic कंपनीने Claude AI तयार केलं आहे, त्यांचा असा दावा आहे की, अमेरिकन सरकार AI चा "दुरुपयोग" करू इच्छित होते. त्यांच्या मते, सरकार Claude चा वापर दोन उद्देशांसाठी करू इच्छित होते. पहिले, स्वतःच्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि दुसरे, स्वचलित शस्त्रे विकसित करण्यासाठी. Anthropic ने यासाठी स्पष्टपणे नकार दिला. करार मोडला गेला. सरकारने OpenAI सोबत नवीन करार केला.

करार मोडल्याची बातमी बाहेर येताच अमेरिकन लोक प्रचंड चिडले. ज्यानंतर OpenAI चे ChatGPT हे अनइंस्टॉल होऊ लागलं, तर त्याऐवजी अमेरिकन लोकं हे मोठ्या प्रमाणात Cloude इंस्टॉल करू लागले.

हा संघर्ष जुना

Anthropic आणि OpenAI मधील स्पर्धा नवीन नाही. Claude चे संस्थापक डारियो अमोदेई हे यापूर्वी OpenAI मध्ये सॅम ऑल्टमनसोबत काम करत होते. पैसे कमविण्याच्या घाईत कंपनी AI सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहे या चिंतेमुळे त्यांनी 2021 मध्ये OpenAI कंपनी सोडली होती. या मतभेदावरच Anthropic ची स्थापना झाली. ही कंपनी एका लिखित AI संविधानानुसार काम करते, सुरक्षितता ही त्याची प्राथमिकता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp