पैसा-पाणी: UPI वारंवार का होतं डाऊन?, पैसा हेच कारण!

मिलिंद खांडेकर, मॅनेजिंग एडिटर

मागील काही दिवसात UPI वारंवार डाऊन होत असल्याचं दिसून आलं आहे. पण या सगळ्यामागचं नेमकं आर्थिक कारण काय हे आपण पैसा-पाणी या विशेष सदरातून जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

पैसा-पाणी: UPI वारंवार का होतं डाऊन?
पैसा-पाणी: UPI वारंवार का होतं डाऊन?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

UPI पूर्णपणे मोफत असल्याने होत आहे डाऊन?

point

UPI व्यवहारांवर तूर्तास तरी सरकार GST लावणार नाही

point

UPI साठी सरकारकडून मिळते सब्सिडी

UPI म्हणजेच यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेसशिवाय (Unified Payments Interface) आता आयुष्याची कल्पनाही करता येणार नाही. जसं आता आपल्यासोबत कायम फोन असतो, तसंच UPI बाबत देखील झालं आहे. UPI वर आपण किती अवलंबून आहोत याचा अंदाज आपल्या यावरून लक्षात येईल की, 2019 मध्ये दर महिन्याला 100 कोटींचे व्यवहार होत होते, आता हे प्रमाण तब्बल 1800 कोटींवर गेले आहे. पण यामुळेच सिस्टमवरचा ताण वाढला आहे आणि यामुळे गेल्या महिन्यात चार वेळा UPI डाऊन झाला. 'पैसा-पाणी' या विशेष ब्लॉगमध्ये आपण आज याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत की, असं नेमकं का होत आहे. 

यामागे एक प्रमुख कारण म्हणजे UPI पूर्णपणे फ्री

जेव्हा UPI डाऊन होत असल्याचं समोर आलं तेव्हा याबाबत  पुन्हा चर्चा सुरू झाली की, आता UPI किती दिवस फ्री राहील? दरम्यान, शुक्रवारी केंद्र सरकारने स्पष्ट केलं की, ₹ 2000 पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर GST लावण्याचा कोणताही विचार नाही. उलट, ₹ 2000 पेक्षा कमी व्यवहारांवर सरकार सबसिडी देतं जेणेकरून UPI सिस्टमची देखभाल करता येईल.

आधी व्यवहारांचे (Transaction) चार्जेस समजून घेऊया:

तुम्ही एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर (IMPS) करता तेव्हा तुम्हाला ₹2 ते ₹15 पर्यंत + GST एवढं शुल्क लागतं.

क्रेडिट कार्ड वापरल्यास दुकानदारांना 1% ते 3% पर्यंत MDR (Merchant Discount Rate) भरावा लागतो. हे पैसे Visa, Mastercard, RuPay आणि बँकांना जातात. त्यामुळे अनेक दुकानदार UPI किंवा कॅश दिल्यास सूट देतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp