पुस्तके दाखवायला अल्पवयीन विद्यार्थिनीच्या घरी गेला अन् तिच्या रुममध्ये जाऊन केलं भयानक कांड, शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

मुंबई तक

Crime News : एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  रविवारी सुट्टीच्या दिवशी पुस्तके दाखवण्याच्या बहाण्याने शिक्षक अल्पवयीन विद्यार्थिनीच्या घरी पोहोचला. यानंतर त्याने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुस्तके दाखवायला विद्यार्थिनीच्या घरी गेला अन् तिच्या रुममध्ये जाऊन केलं भयानक कांड

point

शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

Crime News : एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  रविवारी सुट्टीच्या दिवशी पुस्तके दाखवण्याच्या बहाण्याने शिक्षक अल्पवयीन विद्यार्थिनीच्या घरी पोहोचला. यानंतर त्याने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बिहारमधील बेगुसराय येथील ही घटना आहे. 

हे ही वाचा : मुस्लीम व्यावसायिकाशी प्रेमविवाह, धर्मांतरण, चार मुलं आणि छळ; हिंदू धर्मात घरवापसी केलेल्या सायली सुर्वेचं प्रकरण काय?

पुस्तके दाखवण्याच्या बहाण्याने घरात शिरला

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी उशिरा पुस्तके दाखवण्याचे कारण सांगून या शिक्षकाने घरात घुसून 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलगी जेव्हा फाटलेल्या कपड्यांसह रडत घराबाहेर आली, तेव्हा तिच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. आरोपी शिक्षक घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच गावकरी आणि कुटुंबीयांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात धाडले आहे.

यापूर्वीही विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन

आरोपी शिक्षकाची ओळख प्राथमिक शाळेतील शिक्षक घनश्याम गोस्वामी अशी पटली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही या शिक्षकावर शाळेतील विद्यार्थिनींची छेड काढल्याचे आरोप झाले होते. त्यावेळी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मध्यस्थीमुळे तो अनेकदा वाचला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिक्षकाने चौथ्यांदा ही चूक केली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आणि तणावाचे वातावरण आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp