कल्याण : एका वर्षाच्या बाळासह धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा गेला तोल, RPF जवानाने वाचवले प्राण, VIDEO
एक महिला आपल्या एका वर्षाच्या बाळासह धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी तिचा तोल जाऊन ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडण्याच्या स्थितीत आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कल्याण : एका वर्षाच्या बाळासह धावत्या ट्रेनमधून उतरताना गेला तोल
RPF जवानाने वाचवले आई अन् बाळाचे प्राण
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकावर RPF जवानाच्या सतर्कता आणि धाडसामुळे मोठा अपघात टळला. 'ऑपरेशन जीवन रक्षा' अंतर्गत ड्युटीवर असलेल्या सहायक उपनिरीक्षक (ASI) हेमंत भरगुडे यांनी धावत्या ट्रेनमधून उतरताना घसरलेल्या महिला आणि तिच्या चिमुकल्या बाळाचे प्राण वाचवले.
बाळासह धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न
ही घटना 28 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 5:51 वाजण्याच्या सुमारास घडली. ट्रेन क्रमांक 01144 (अप दानापूर–एलटीटी एक्सप्रेस) प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर येत असताना एक महिला आपल्या एका वर्षाच्या बाळासह धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी तिचा तोल जाऊन ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडण्याच्या स्थितीत आली. स्थितीची गंभीरता ओळखून ड्युटीवर असलेले RPF थाना कल्याण येथील एएसआय हेमंत भरगुडे यांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ धाव घेतली आणि महिला व तिच्या बाळाला सुरक्षितपणे बाहेर ओढून घेतले.
हे ही वाचा : महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरेंनी विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करताच काँग्रेसची मोठी घोषणा
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
ही संपूर्ण घटना स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. RPF अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एएसआय हेमंत भरगुडे यांच्या सतर्कता, त्वरित निर्णयक्षमता आणि धाडसी कृतीमुळे दोन जीव वाचवणे शक्य झाले, जे अत्यंत कौतुकास्पद आहे. या घटनेची नोंद रोजनाम्यात करण्यात आली आहे. RPF कडून राबविण्यात येणारे “ऑपरेशन जीवन रक्षा” हे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, ही घटना त्याचे प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.
हे ही वाचा : ठाकरे गटाचा विधानपरिषदेचा उमेदवार ठरला, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा
महिलेने मानले आभार
त्यांच्या या तात्काळ आणि धाडसी कृतीमुळे मोठा अपघात टळला आणि दोन अनमोल जीव वाचले. वाचवण्यात आलेल्या महिलेने आपले नाव अंतिमा शुक्ला (वय 24, रा. दिवा, ठाणे) असे सांगितले. ती आपल्या एक वर्षीय मुलगा सर्वज्ञ शुक्ला याच्यासह प्रयागराज ते मुंबई असा प्रवास करत होती. घटनेनंतर महिलेने RPF तसेच विशेषतः एएसआय हेमंत भरगुडे यांचे मनःपूर्वक आभार मानले.









