नागपूर : पत्नी गुपचूप शिक्षकाला भेटायची, अनैतिक संबंधाची खबर पोलीस पतीला मिळाली; शेवटी काय घडलं?
Nagpur Crime : पत्नीचे अनैतिक संबंध आणि मानसिक त्रासाला कंटाळून नागपूरच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नागपूर : पत्नी गुपचूप शिक्षकाला भेटायची,
अनैतिक संबंधाची खबर पोलीस पतीला मिळाली; शेवटी काय घडलं?
Nagpur Crime : नागपूर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. शीलरत्न भीमराव बेलेकर (वय 45) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, ते नागपूरच्या प्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. शीलरत्न यांची पत्नी रुचिका बेलेकर (वय 32) हिचे महेश मेश्राम नावाच्या शिक्षकासोबत गेल्या दोन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधाची माहिती शीलरत्न यांना मिळाल्यानंतर घरात सतत वाद होऊ लागले होते. रुचिका शीलरत्न यांच्यावर घटस्फोट घेण्यासाठी आणि सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्यासाठी वारंवार दबाव टाकत होती. इतकेच नव्हे तर, ती त्यांना मानसिकदृष्ट्या छळ करून "तुम्ही मरून जा" अशा शब्दांत हिणवत असे, ज्यामुळे ते प्रचंड तणावाखाली होते.
अंबाझरी तलावात आढळला मृतदेह; दोन महिन्यांपासून सुरू होता शोध
पत्नीच्या सततच्या जाचाला कंटाळून शीलरत्न फेब्रुवारी महिन्यात आपल्या भावाच्या घरी राहायला गेले होते. 22 फेब्रुवारी रोजी ते तिथून बाहेर पडले, त्यानंतर त्यांचा कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्या कुटुंबियांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. दीर्घकाळाच्या शोधानंतर, 24 एप्रिल रोजी अंबाझरी तलावात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली होती, मात्र सखोल तपास सुरू असताना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. शीलरत्न यांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या सततच्या छळाला आणि मानसिक त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा : कधीकाळी 32 मतांनी निवडणूक जिंकून आमदार झाले, भाजपने विधानपरिषदेची संधी दिलेले प्रमोद जठार कोण आहेत?









