अकोला : विवाहित असूनही कथित 'बादशाह'ने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, 5 दिवस घरात डांबून नको ते...
Akola Crime : अकोल्यात गेमिंग ॲपच्या माध्यमातून ओळख करून हरियाणातील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा प्रकार उघड झाला असून, 'लव जिहाद'चा आरोप करत हिंदू संघटनांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अकोला : विवाहित असूनही कथित 'बादशाह'ने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं
5 दिवस घरात डांबून नको ते...
अकोला जिल्ह्यात कथित 'लव जिहाद'चे एक खळबळजनक प्रकरण समोर आले असून यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका विवाहित मुस्लिम युवकाने गेमिंग ॲपच्या माध्यमातून आपली खोटी ओळख सांगून हरियाणातील एका हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित आरोपीने या तरुणीला अकोल्यात बोलावून घेतले आणि सलग पाच दिवस तिला आपल्या घरात ठेवले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच खदान पोलिसांनी तातडीने कारवाई करत तरुणीची सुटका केली आणि आरोपीला ताब्यात घेतले आहे. खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील कारवाईसाठी आरोपीला हरियाणा पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.
हेही वाचा : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव केल्यानंतर स्वरुपानंद देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
'बादशाह' नावाने बनावट अकाउंट; विवाहित तरुणाने केला तरुणीचा 'ब्रेनवॉश'
या प्रकरणातील मुख्य आरोपीची ओळख जमीर जाहीरउद्दीन काजी (वय 25 अशी झाली असून तो आधीच विवाहित आहे आणि त्याला एक मूल देखील आहे. आरोपी जमीर एका गेमिंग ॲपवर 'बादशाह' या नावाने बनावट अकाउंट चालवत होता आणि त्या माध्यमातून तो वेगवेगळ्या तरुणींशी संपर्क साधत असे. याच दरम्यान त्याची ओळख हरियाणातील एका तरुणीशी झाली आणि त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अकोल्यात येण्यास प्रवृत्त केले. आरोपीने या तरुणीला गीता नगर परिसरातील आपल्या घरात पाच दिवस ठेवले होते. तरुणीने आपल्या घरी आई ओरडल्याचे सांगितल्यावर, त्याचा फायदा घेऊन आरोपीने तिचे 'ब्रेनवॉश' केले आणि तिला स्वतःकडे राहण्यास भाग पाडले, असा दावा केला जात आहे.
भावाच्या शोधामुळे फुटले भांडं; हिंदू संघटना आक्रमक









