महाराष्ट्र आता थांबणार नाही, मंत्रिमंडळ बैठकीतील 7 धडाकेबाज निर्णय

मुंबई तक

Maharashtra Cabinet Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

Maharashtra Cabinet Decision Maharashtra Cabinet Decision
Maharashtra Cabinet Decision
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र आता थांबणार नाही

point

मंत्रिमंडळ बैठकीतील 7 धडाकेबाज निर्णय

Maharashtra Cabinet Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (29 एप्रिल) राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Meeting) पार पडली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7  महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना करण्यात आली असून महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. नेमके कोणते निर्णय घेण्यात आले आहेत. जाणून घेऊयात.. 

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

एआयच्या विश्वात महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी पाऊल. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण २०२६ जाहीर. राज्यात दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि दीड लाख रोजगार संधीची निर्मिती. राज्यभरात एआयच्या संधीचे संतुलन साधण्यासाठी सहा एआय-उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार. याशिवाय पाच एआय इनोव्हेशन सिटीज ची स्थापना होणार. महाराष्ट्राचे एआय पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देणारे दमदार धोरण.
(इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता विभाग)

सामजिक समता व समरसता वर्षा निमित्त साता समुद्रापार महापुरूषांच्या विचारांचा जागर. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या प्रख्यात संस्थेत भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापनेचा महत्त्वपूर्ण निर्णय. कायमस्वरूपी अध्यासनाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार. (सामाजिक न्याय विभाग)

हेही वाचा : नागपूर : पत्नी गुपचूप शिक्षकाला भेटायची, अनैतिक संबंधाची खबर पोलीस पतीला मिळाली; शेवटी काय घडलं?

हे वाचलं का?