महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरेंनी विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करताच काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई तक

Maharashtra Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झालेली पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडे एकमेव जागा निवडून आणण्याची ताकद असताना मविआतील दोन पक्ष उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Vidhan Parishad Election
Maharashtra Vidhan Parishad Election
google news

बातम्या हायलाइट

point

महाविकास आघाडीत बिघाडी

point

ठाकरेंनी विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करताच काँग्रेसची मोठी घोषणा

Maharashtra Vidhan Parishad Election : महाविकास आघाडीकडे विधानपरिषदेवर निवडून आणता येईल, अशी केवळ एकमेव जागा आहे. या जागेवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली होती. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेने विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी झालेली पाहायला मिळत आहे. एकीकडे बिनविरोध निवडणूक होईल, अशी चर्चा असताना आता काँग्रेसही त्यांचा उमेदवार देणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झालेली पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव केल्यानंतर स्वरुपानंद देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

महायुती देखील 10 वा उमेदवार मैदानात उतरवू शकते? 

उद्धव ठाकरेंनी स्वत: विधानपरिषदेवर जाण्याचं टाळल्याने आता काँग्रेस उमेदवार देणार असल्याचं समोर आलंय. तर राष्ट्रवादीने आम्ही एकत्र बसून मार्ग काढू, अशी भूमिका घेतलीये. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. इतकेच नाही तर महायुती देखील आता उद्धव ठाकरे ही जागा लढवत नसल्याने त्यांचा उमेदवार मैदानात उतरवू शकते.

विधानपरिषदेची निवडणूक आता बिनविरोध होणार की नाही? 

ठाकरेंच्या शिवसेनेने अंबादास दानवे यांना उमेदवार जाहीर केल्याने विधानपरिषद  निवडणुकीच्या मैदानात नव्याने अस्थिरता निर्माण झाली आहे. आता नाराज झालेली काँग्रेस स्वतःचा उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. दरम्यान, महायुती या फुटीचा फायदा घेण्याच्या तयारीत असून, महाविकास आघाडीच्या एकमेव जागेच्या प्रयत्नांना खीळ घालण्यासाठी दहावा उमेदवार उभा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आघाडीच्या फुट पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने विधानपरिषदेची ही निवडणूक आता बिनविरोध होते की नाही? असा प्रश्न निर्माण झालाय. 

हे वाचलं का?