शेतात जातो असे सांगून अल्पवयीन मुलगा घरी परतला नाही, 15 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, मृतदेह नाल्यात आढळला
Crime News : एका गावात अल्पवयीन मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका नाल्यात आढळून आला होता. त्याच्या गळ्यात एक दोरा देखील आढळून आला होता. प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. संबंधित प्रकरणाबाबत वडिलांचे म्हणण असं की, त्याचे कोणीही शत्रू नव्हते. त्याच्या मुलाला कोणी मारलं याबाबत त्यांना माहिती नाही. कुटुंबात तो एकुलता एक होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शेतात जात असल्याचे सांगून मुलगा घराबाहेर पडला
जवळच्या नाल्यात आढळला मृतदेह
Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूरमधील कथेटा गावात अल्पवयीन मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका नाल्यात आढळून आला होता. त्याच्या गळ्यात एक दोरा देखील आढळून आला होता. प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. संबंधित प्रकरणाबाबत वडिलांचे म्हणण असं की, त्याचे कोणीही शत्रू नव्हते. त्याच्या मुलाला कोणी मारलं याबाबत त्यांना माहिती नाही. कुटुंबात तो एकुलता एक होता.
हे ही वाचा : 'जीजूंनी माझ्या स्वप्नात येऊन छेड काढली..', मेहुणीने तुरुंगात पाठवलं, सात वर्षांनी जबाब बदलला!
शेतात जात असल्याचे सांगून मुलगा घराबाहेर पडला
दरम्यान, कुटुंबात मृत तरुण हा एकुलता एक मुलगा होता, त्याच्या कुटुंबातील पत्नी सारिका, दोन मुली राधा आणि सोना अशी त्यांची नावे आहेत, तर मृत मुलगा प्रतीक उर्फ कृष्णा (वय 15) असे त्यांचं नाव होते. तो इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत होता आणि हात तुटल्याने काही दिवसांपासून तो शाळेत गेला नाही. शनिवारी दुपारी कृष्णा 500 मीटर अंतरावरून असलेल्या त्यांच्या शेतात जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला. त्याने कुटुंबाला सांगितले की, शेतात गुरे घुसली असून तो त्यांना हाकलून लावणार आहे. तो सायंकाळी उशिरापर्यंत परतलाच नाही तेव्हा त्याचा शोध सुरु करण्यात आला होता.
जवळच्या नाल्यात आढळला मृतदेह
शेतानजीक एक सायकल आढळून आली होती. जवळच्या एका शेतकऱ्याने सांगितले की, बराच वेळ सायकल त्याच ठिकाणी होती. त्याच्या हाकेला कोणीही प्रतिसाद दिला नाही, तेव्हा जवळच शोध घेण्यात आला होता. त्याचा मृतदेह जवळच्या नाल्यात आढळून आला होता. मृतदेहाला एक दोर बांधला होता, वडील संतोष यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी मृतदेहाला बांधलेली दोर सोडवली.
हे ही वाचा : सोनं-चांदी, शेतजमीन ते कर्ज...; शिंदेंच्या शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या ज्योती वाघमारेंची संपत्ती किती?










