'जीजूंनी माझ्या स्वप्नात येऊन छेड काढली..', मेहुणीने तुरुंगात पाठवलं, सात वर्षांनी जबाब बदलला!

मुंबई तक

Crime News : या प्रकरणाची पार्श्वभूमी 2019 सालातील आहे. बिठूर येथील रहिवासी आणि सध्या पुण्यात हवाई दलात कॉर्पोरल पदावर कार्यरत असलेल्या तरुणाचा विवाह फेब्रुवारी 2019 मध्ये झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच त्याची 15 वर्षीय मेहुणी त्यांच्याकडे राहण्यास आली होती. 8 मार्च 2019 च्या रात्री ही मुलगी अचानक मोठ्याने ओरडू लागली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'जीजूंनी माझ्या स्वप्नात येऊन छेड काढली..',

point

मेहुणीने तुरुंगात पाठवलं, सात वर्षांनी जबाब बदलला!

Crime News : एखाद्याचे स्वप्न दुसऱ्याच्या आयुष्यात किती मोठा भूकंप आणू शकते, याचा प्रत्यय कानपूरमधील एका अजब घटनेने दिला आहे. एका अल्पवयीन मेहुणीने पाहिलेल्या स्वप्नामुळे तिच्या हवाई दलात कार्यरत असलेल्या मेहुण्याला तब्बल सात वर्षे कायदेशीर लढाई लढावी लागली आणि 19 दिवस तुरुंगातही काढावे लागले. मात्र, अखेर शनिवारी न्यायालयाने या जवानाची सन्मानाने सुटका केली. पीडितेने न्यायालयात दिलेली साक्ष सर्वांना थक्क करणारी ठरली, कारण तिने मान्य केले की तिच्यासोबत घडलेली ती छेडछाडीची घटना वास्तव नसून केवळ एक स्वप्न होते.

या प्रकरणाची पार्श्वभूमी 2019 सालातील आहे. बिठूर येथील रहिवासी आणि सध्या पुण्यात हवाई दलात कॉर्पोरल पदावर कार्यरत असलेल्या तरुणाचा विवाह फेब्रुवारी 2019 मध्ये झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच त्याची 15 वर्षीय मेहुणी त्यांच्याकडे राहण्यास आली होती. 8 मार्च 2019 च्या रात्री ही मुलगी अचानक मोठ्याने ओरडू लागली. तिने असा आरोप केला की, ती झोपलेली असताना तिच्या मेहुण्याने तिला पकडले आणि तिच्याशी अश्लील चाळे केले. या घटनेच्या पाच महिन्यांनंतर पीडितेच्या वडिलांनी नौबस्ता पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा : काँग्रेस नेत्याची आमदारकी रद्द, उच्च न्यायालयाने भाजपच्या पराभूत उमेदवाराला आमदार करुन टाकलं, नेमकं कारण काय?

विशेष पॉक्सो न्यायालयात जेव्हा या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली, तेव्हा पीडितेने दिलेला जबाब ऐकून न्यायाधीशही चकित झाले. पीडितेने सांगितले की, त्या रात्री तिने अँटीबायोटिक औषध घेतले होते आणि ती गाढ झोपेत होती. झोपेत तिला असे वाटले की तिच्या मेहुण्याने तिला पकडले आहे, ज्यामुळे ती घाबरून ओरडू लागली. तिने स्पष्ट केले की, ती केवळ एक स्वप्न होते आणि प्रत्यक्षात मेहुण्याने तिला स्पर्शही केला नव्हता. केवळ औषधांच्या प्रभावामुळे तिला तो भास झाला होता. इतकेच नाही तर पीडितेचे वडील आणि आरोपीची पत्नी यांनीही न्यायालयात कबुली दिली की, केवळ गैरसमजातून त्यांनी हा खटला दाखल केला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp