सोनं-चांदी, शेतजमीन ते कर्ज...; शिंदेंच्या शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या ज्योती वाघमारेंची संपत्ती किती?

अतिक शेख

Jyoti Waghmare Networth : ज्योती वाघमारे या सोलापूर जिल्ह्यातून येतात. गेल्या 15 वर्षांपासून वंचित घटकांसाठी काम केल्याचं दाखला दिला जातो आहे. काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात केलेल्या वाघमारेंनी २०२३ मध्ये शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. उच्चशिक्षित महिला चेहरा असल्याचं हेरून शिंदेंनी ज्योती वाघमारेंची थेट शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती केली होती.

ADVERTISEMENT

Jyoti Waghmare Net worth
Jyoti Waghmare Net worth
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोनं-चांदी, शेतजमीन ते कर्ज...;

point

शिंदेंच्या शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या ज्योती वाघमारेंची संपत्ती किती?

Jyoti Waghmare Networth : राज्यसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी मातब्बर नेत्यांना बाजूला ठेवून सामान्य घरातून येणाऱ्या ज्योती वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं. कधी आमदार सुद्धा न झालेल्या ज्योती वाघमारेंना थेट खासदारकीची लॉटरी लागली. वाघमारे या शिवसेनेच्या फायरब्रँड प्रवक्त्या असून त्यांच्या राज्यसभेवर जाण्यामुळे अनेकांचे धाबे दणादले आहेत. परंतु आता ज्योती वाघमारेंनी अर्ज भरताना निवडणूक आयोगाला त्यांच्याकडे एकुण संपत्ती किती आहे? याची माहिती सांगितली आहे. उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या शपथपत्रात ज्योती वाघमारेंकडे लाखोचे सोने, चांदी, महागडी शेतजमीन असल्याचं उघड झालंय. याशिवाय जंगम आणि स्थावर मालमत्तेसह अन्य प्रॉपर्टीची बेरीज केल्यास ज्योती वाघमारे यांच्याकडे कोटभर संपत्ती असल्याचं स्पष्ट होतंय.

 ज्योती वाघमारेंची संपत्ती किती? 

ज्योती वाघमारेंनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रानुसार, त्यांच्याकडे 5,78,088 रुपयांची जंगम मालमत्ता असून 32,74,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. याशिवाय 14,10,000 रुपयांची वारसाप्राप्त संपत्ती आणि 33,60,000 रुपयांची स्वसंपादित मालमत्ता वाघमारेंच्या नावावर आहे. वाघमारेंकडे 63 हजारांची रोख रक्कम असून 27,74,000 किंमतीची शेतजमीन देखील आहे. वाघमारेंवर एकुण 27,40,564 रुपयांचं कर्ज देखील आहे.ज्योती वाघमारे यांच्याकडे २,५२,१०० किंमतीचं १७ ग्रॅम सोनं, १७,२४४ रुपयांची ४१ ग्रॅम चांदीचे दागिने आहेत. याशिवाय ९५,००० रुपयांची सुझुकी कंपनीची बर्गमन स्ट्रीट गाडी वाघमारेंच्या नावे आहे. एकूण संपत्तीचा विचार केला तर ज्योती वाघमारे या 1 कोटी 41 लाख 99 हजार 652 रुपये एवढ्या प्रॉपर्टीच्या मालकीण आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्योती वाघमारेंनी आपल्यावर कोणताही फौजदारी स्वरुपाचा गुन्हा नसल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा : केतूचे भ्रमण आणणार समृद्धी, राजयोगासारखं सुख मिळणार, 'या' तीन राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु

ज्योती वाघमारे या सोलापूर जिल्ह्यातून येतात. गेल्या 15 वर्षांपासून वंचित घटकांसाठी काम केल्याचं दाखला दिला जातो आहे. काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात केलेल्या वाघमारेंनी २०२३ मध्ये शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. उच्चशिक्षित महिला चेहरा असल्याचं हेरून शिंदेंनी ज्योती वाघमारेंची थेट शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती केली होती. याशिवाय धाराशीव जिल्ह्याच्या संपर्कपदाचीही जबाबदारी त्यांच्यावर होती. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड या भाषांवर प्रभुत्व असलेल्या ज्योती वाघमारेंच्या राज्यसभेतील कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणारय. 

हे वाचलं का?

    follow whatsapp