केतूचे भ्रमण आणणार समृद्धी, राजयोगासारखं सुख मिळणार, 'या' तीन राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु
Astrology 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्याच नक्षत्रात गोचर (भ्रमण) करतो, तेव्हा त्याचे फळ अत्यंत प्रभावी ठरते. केतूचे हे गोचर विशेषतः तीन राशींसाठी 'गोल्डन पिरीयड' प्रमाणे सिद्ध होणार आहे. वैदिक ज्योतिषात ग्रहांची चाल आणि त्यांचे नक्षत्र परिवर्तन यांचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
केतूचे भ्रमण आणणार समृद्धी
राजयोगासारखं सुख मिळणार
'या' तीन राशींचा सुवर्णकाळ सुरु
Astrology 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्याच नक्षत्रात गोचर (भ्रमण) करतो, तेव्हा त्याचे फळ अत्यंत प्रभावी ठरते. केतूचे हे गोचर विशेषतः तीन राशींसाठी 'गोल्डन पिरीयड' प्रमाणे सिद्ध होणार आहे. वैदिक ज्योतिषात ग्रहांची चाल आणि त्यांचे नक्षत्र परिवर्तन यांचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. 29 मार्च 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाची खगोलीय घटना घडणार आहे. या दिवशी केतू स्वतःच्या 'मघा' नक्षत्रात प्रवेश करतील. यामुळे काही राशींवर केतूची कृपा बरसणार आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी... LPG सिलेंडर बुकिंगसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, 'हा' नियम तुम्हीही पाहा; नाहीतर...
'या' राशींना मिळणार रोजयोगासारखं सुख
मेष : मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येईल. करिअरमध्ये नवीन शक्यतांची दारे उघडतील. दीर्घकाळ रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात अचानक मोठा धनलाभ होण्याचे योग आहेत. गुंतवणुकीशी संबंधित निर्णयात तुम्हाला यश मिळेल. तुमचा आत्मविश्वास शिखरावर असेल, ज्यामुळे महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुम्हाला फायदा होईल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी तुमची भेट होऊ शकते.
सिंह : सिंह राशीच्या लोकांसाठी केतूचे हे गोचर सुख आणि समृद्धीचे संकेत आहे. आर्थिक दृष्टीने हा काळ अत्यंत शुभ आहे. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती (promotion) मिळू शकते. जर तुम्हाला परदेशात करिअर करायचे असेल, तर तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. घर-परिवारात आनंदाचे वातावरण राहील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल.










