बुलढाणा : नवऱ्याने महिला शिक्षिकेच्या अपघातासाठी मित्राला दिली सुपारी, अपघाताचं स्वरुप दाखवून केली हत्या

मुंबई तक

Buldhana crime : बुलढाणा जिल्ह्यात 2 मार्च रोजी आपल्या दुचाकी गाडीवरून एक महिला शिक्षिका शाळेत जात होती. यादरम्यान एका गाडीने तिच्या वाहनाला ठोकर देत उडवलं. या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला. मृत झालेल्या शिक्षिकेचं नाव वृषाली प्रकाश गावंडे असे आहे. या खळबळजनक घटनेनं परिसर हदारून गेला आहे. 

ADVERTISEMENT

Buldhana crime
Buldhana crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मृत महिलेच्या अपघातावर नातेवाईकांचा संशय

point

पती आणि इतर दोघांना अटक

Buldhana Crime : जका खान - बुलढाणा जिल्ह्यात 2 मार्च रोजी आपल्या दुचाकी गाडीवरून एक महिला शिक्षिका शाळेत जात होती. यादरम्यान एका गाडीने तिच्या वाहनाला ठोकर देत उडवलं. या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला. मृत झालेल्या शिक्षिकेचं नाव वृषाली प्रकाश गावंडे असे आहे. या खळबळजनक घटनेनं परिसर हदारून गेला आहे. 

हे ही वाचा : पीडित महिलेला झोपडीत बोलावले, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये दांडकं घालून... जादूटोण्याचा संशय अन् महिलेचा बळी

मृत महिलेच्या अपघातावर नातेवाईकांचा संशय

मृत महिलेच्या नातेवाईकांनी या अपघातावर संशय व्यक्त केला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. महिला पोलीस अधिकारी स्नेहा शेडगेने आजतक या वृत्तमाध्यमाशी बोलताना सांगितले की, 2 मार्च रोजी घटनास्थळी रोडवरील सीसीटीव्हीचा तपास करण्यात आला होता. त्या सीसीटीव्हीत दिसत असलेल्या फुटेजमध्ये एका वाहनावर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्याच वाहनाच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी तपास केला आणि त्याची चौकशी केली असता, पोलीस देखील चक्रावले. मृत महिलेच्या नवऱ्याच्या मित्राने ही घटना घडवून आणली होती. त्या कामाचे त्याला 1 लाख सुपारी दिली होती. 

पती आणि इतर दोघांना अटक

तसेच जळगाव जामोद पोलीस ठाण्यात शिक्षक पती आणि इतर दोघांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा यांनी सांगितलं की, तांत्रिकदृष्ट्या संबंधित सीसीटीव्हींचा तपास करण्यात आला होता. तसेच आरोपी शिक्षिकेचा पती आणि इतर दोघांना अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले होते. तसेच गाडी चालकाकडे दिलेली 1 लाख रक्कम देखील पोलिसांनी जप्त केली आहे. 

हे ही वाचा : IT इंजिनिअरचं हैवानी कृत्य, जुळ्या बहिणीवर 40 वार.. आईलाही संपवण्याचा प्लॅन, पुण्यातील 'त्या' तरूणीचा भलताच अँगल!

याआधी मृत महिलेचा सासरच्यांवर छळाचा गुन्हा 

दरम्यान, या घटनेपूर्वी मृत शिक्षिकेनं काही महिन्यांपूर्वी सासरच्या लोकांवर छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शिक्षिका आणि त्यांचा पती हे दोघेही विभक्त राहू लागले होते. जर पोलिस प्रशासनाने गांभीर्य दाखवले नसते तर कदाचित अपघाताच्या स्वरूपात झालेला खून उघडकीस आला नसता, अशी चर्चा बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp