'म्हातारपणात 7 व्यांदा लग्न करु लागला बाप,..कोणी तरी थांबवा', लेकाने सगळंच काढलं, पोलीसही चक्रावले

मुंबई तक

crime news : बारावीचा एक विद्यार्थी त्याच्या वडिलांच्या लग्नाची तयारी थांबवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला होता. हे प्रकरण त्याच्या वडिलांच्या सातव्या लग्नाशी संबंधित आहे आणि अल्पवयीन मुलाने पोलिसांकडे विनंती केली आहे की, 'साहेब, कृपया माझ्या वडिलांना लग्नापासून थांबवा, पण ते थांबत नाहीत'.  या प्रकरणात मुलानेच वडिलांच्या विवाहाबाबत मोठी पोलखोल केली.

ADVERTISEMENT

Crime news
AI Photo
google news

बातम्या हायलाइट

point

2024 मध्ये वडिलांचे सहावे लग्न 

point

वडिलांच्या सातव्या लग्नासाठी जमीन विकण्याचा निर्णय

point

लेकाने केली पोलखोल

Crime news : उत्तर प्रदेशातील आजमगढमध्ये एका वडिलांनी अहरौला येथे, बारावीचा एक विद्यार्थी त्याच्या वडिलांच्या लग्नाची तयारी थांबवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला होता. हे प्रकरण त्याच्या वडिलांच्या सातव्या लग्नाशी संबंधित आहे आणि अल्पवयीन मुलाने पोलिसांकडे विनंती केली आहे की, 'साहेब, कृपया माझ्या वडिलांना लग्नापासून थांबवा, पण ते थांबत नाहीत'. 

हे ही वाचा : सोनं-चांदी, शेतजमीन ते कर्ज...; शिंदेंच्या शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या ज्योती वाघमारेंची संपत्ती किती?

2024 मध्ये वडिलांचे सहावे लग्न 

वृद्ध वडील हे 55 वर्षीय असून त्यांच्याच मुलाने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. मुलाच्या म्हणण्यांनुसार, त्याच्या वडिलांनी सहा वेळा विवाह केले होते. त्यातील ट्विस्ट असा की, संबंधित तरुण हा त्याच्या तिसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. मुलाने सांगितले की, त्याच्या वडिलांनी 2024 मध्ये सहावे लग्न केले होते, परंतु काहीच दिवसांमध्ये पत्नी जमीन आणि दागिन्यांची मागणी करत कुटुंब सोडून निघून गेली होती. तरीही, त्या माणसाने हार मानली नाही आणि आता तो सातव्यांदा बोहल्यावर चढणार आहे. 

वडिलांच्या सातव्या लग्नासाठी जमीन विकण्याचा निर्णय

मुलाचे दु:ख केवळ त्याच्या वडिलांच्या लग्नापुरते मर्यादित नाही तर कुटुंबाची ढासळणारी आर्थिकस्थिती देखील आहे. दरम्यान, असे म्हटले जाते की, त्याचे वडील हे म्हतारपणी वृद्ध झाले. त्याने आपल्या सातव्या लग्नासाठी वडिलोपार्जित जमीन विकण्याचा निर्णय घेतला. मुलाने दावा केला की, त्याने जमीन विकण्यासाठी 50 हजार रुपये अॅडव्हान्स घेतले होते. धक्कादायक बाब अशी की, वडिलांनी याआधीच काही पैसे विकले होते आणि मुलगा स्वत: कर्ज फेडत आहे. 

हे ही वाचा : गडचिरोली : आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार, मामाच्या घरात काय घडले?

जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा या घटनेला वेगळे वळण प्राप्त झाले. पोलिसांनी असा विश्वास केला की, या प्रकरणात केवळ अनेक विवाहच नाहीत तर जमीन आणि मालमत्तेचे विभाजन देखील असू शकते. सध्या, पोलीस लग्नाच्या नोंदी आणि जमिनीच्या व्यवहाराची सखोल चौकशी केली. 

हे वाचलं का?