गडचिरोली : आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार, मामाच्या घरात काय घडले?

मुंबई तक

​Gadchiroli Crime News : एका बाजूला जिल्हा होळीच्या रंगात न्हाऊन निघाला असताना, दुसऱ्या बाजूला कोरची तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या एका 8 वर्षीय निरागस अनाथ चिमुरडीवर तिच्याच नात्यातील 22 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.

ADVERTISEMENT

​Gadchiroli Crime News
​Gadchiroli Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गडचिरोली : आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार

point

मामाच्या घरात काय घडले?

​Gadchiroli Crime News, व्येकटेश दुडमवार : एका बाजूला जिल्हा होळीच्या रंगात न्हाऊन निघाला असताना, दुसऱ्या बाजूला कोरची तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या एका 8 वर्षीय निरागस अनाथ चिमुरडीवर तिच्याच नात्यातील 22 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

हे ही वाचा : सोनं-चांदी, शेतजमीन ते कर्ज...; शिंदेंच्या शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या ज्योती वाघमारेंची संपत्ती किती?

होळीच्या दिवशी फूस लावून अत्याचार

पीडित मुलगी अनाथ असून तिचा सांभाळ तिचे मामा-मामी अत्यंत मायेने करतात. होळीच्या दिवशी सर्वत्र सणाचा उत्साह असताना, आरोपीने या चिमुरडीला फूस लावून आपल्या घरी नेले. रक्ताच्या नात्यातील या नराधमाने विश्वासघात करत तिच्यावर अत्याचार केला. 'कोणाला काही सांगितल्यास जीवंत सोडणार नाही,' अशी धमकी देऊन त्याने चिमुरडीला दहशतीखाली ठेवले होते.

अंघोळ घालताना मामीला धक्का

​आरोपीच्या धमकीमुळे ही चिमुरडी पाच दिवस प्रचंड दहशतीखाली होती. मात्र, पाच दिवसांनंतर तिला आंघोळ घालताना मामीला तिच्या शरीरावरील जखमा आणि पोटावरील सूज दिसून आली. मामीने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, चिमुरडीने आपल्यावर ओढवलेला हा भीषण प्रसंग सांगितला. हे ऐकताच नातेवाईकांना मोठा धक्का बसला.

हे वाचलं का?

    follow whatsapp