'नवऱ्याचे कर्ज माफ करतो..' हॉटेलमध्ये बोलवून वसुली कर्मचाऱ्याचा महिलेवर अत्याचार अन् नंतर पाठवली नोटीस; 'असे' उलगडले गुपित
Crime News : वसुली कर्मचाऱ्यांमार्फत कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपन्या सतत तगादा लावत असतात. यातून अनेक गुन्हे उद्भवताना आपण बघतो. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्ज माफ करण्याचे प्रलोभन दाखवून एका फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याने महिलेवर बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवऱ्याचे कर्ज माफ करतो..
हॉटेलमध्ये बोलवून वसुली कर्मचाऱ्याचा महिलेवर अत्याचार अन् नंतर पाठवली नोटीस
'असे' उलगडले गुपित
Crime News : फायनान्स कंपन्यांचे वाढते जाळे आणि त्यामुळे ईएमआयच्या जाळ्यात अडकत चाललेले लोक यांचे प्रमाण खूप वाढले आहे. वसुली कर्मचाऱ्यांमार्फत कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपन्या सतत तगादा लावत असतात. यातून अनेक गुन्हे उद्भवताना आपण बघतो. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्ज माफ करण्याचे प्रलोभन दाखवून एका फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याने महिलेवर बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. उत्तराखंडच्या रुद्रपूर परिसरातील ही घटान असून पोलिस अधिक तपास करत आहेत. नेमकी घटना काय आहे, जाणून घेऊया.
हे ही वाचा : 'जीजूंनी माझ्या स्वप्नात येऊन छेड काढली..', मेहुणीने तुरुंगात पाठवलं, सात वर्षांनी जबाब बदलला!
शरीरसुखाची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या पतीने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याने एका फायनान्स कंपनीकडून 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. तो नियमीतपणे या कर्जाचे हप्ते भरत होता. यादरम्यान, कंपनीचा एक वसुली कर्मचारी त्याच्या पत्नीच्या संपर्कात आला. त्याने महिलेला संपूर्ण कर्जमाफीचे आमिष दाखवले. मात्र याबदल्यात तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.
हॉटेलमध्ये बोलवून अत्याचार
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 2 फेब्रुवारी रोजी तिला एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तिथे तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. पीडितेने लोकलज्जेस्तव आणि कुटुंबाच्या इज्जतीचा हवाला देऊन तिला सोडून देण्याची विनवणी केली, पण आरोपीने तिचे काहीही न ऐकता जबरदस्ती केली.










