पैसा-पाणीः अर्थसंकल्पानंतर 10 लाख कोटी रुपये का बुडले?
अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाली. ज्यामध्ये गुंतवणूकदारांचे तब्बल 10 लाख कोटी रुपये बुडाले. पण नेमकं कशामुळे झालं हेच आपण जाणून घेऊया पैसा-पाणी या विशेष सदरातून.
ADVERTISEMENT

अर्थसंकल्पानंतर STT म्हणजेच सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (Securities Transaction Tax) पुन्हा चर्चेत आला आहे. अर्थमंत्र्यांनी F&O मध्ये STT वाढवला आहे. फ्युचर्समध्ये 150% ची वाढ झाली आहे म्हणजेच पूर्वी 0.02% कर होता, आता तो 0.05% पर्यंत वाढला आहे तर Options मध्ये तो 50% आहे. पूर्वी 0.10 टक्के कर होता आता तो 0.15 टक्के आहे. रोख बाजारातील दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या करवाढीचा परिणाम असा झाला की शेअर बाजार दोन टक्क्यांनी घसरला. त्यामुळे सुमारे दहा लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले
पैसा-पाणीच्या या सदरातून समजून घेऊया की STT म्हणजे काय?
हा कर यूपीए सरकारने 2004 मध्ये आणला होता. शेअर मार्केटमध्ये खरेदी-विक्रीवर कर लादण्यात आला होता. हा एक प्रकारचा टोल टॅक्स आहे. हायवेवर आल्यास किंवा गेल्यास कर भरावा लागेल. तेव्हा सरकार म्हणालेलं की, हा कर द्या, आम्ही शेअर्सवर LTCG म्हणजेच लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लावणार नाही.
NDA सरकारने ते 2018 मध्ये बदलवून टाकलं. STT कायम ठेवला, LTCG पुन्हा शेअर नफ्यावर लादला. आता सरकारचा तर्क होता की, उर्वरित मालमत्तेवर LTGC आकारला जातो, मग शेअर्स वेगळे कसे ठेवायचे? 2024 मध्ये हा कर 12.5% करण्यात आला.
या दोन करांमुळे गुंतवणूकदार विशेषत: FII त्रस्त झाले होते. बाजारात मंदी आहे त्यामुळे STT आणि LTCG मध्ये दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती पण अर्थमंत्र्यांनी त्यात वाढ केली. भारताच्या जीडीपीपेक्षा डेरिव्हेटिव्ह्जमध्ये दरवर्षी 500 पट अधिक व्यापार होत असल्याचे सरकारचे तर्क आहे. भारताचा जीडीपी 300 लाख कोटी रुपये आहे तर डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग 150 लाख कोटी रुपये आहे. हा सट्टा रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
SEBI अहवाल सांगतो की, 100 पैकी 90 गुंतवणूकदार F&O मध्ये तोट्यात आहेत. हे थांबवण्यासाठी गेल्या दोन वर्षांत पावलेही उचलण्यात आली असून, उलाढाल 25 टक्क्यांनी घटली आहे. सरकारला हे पुरेसे वाटत नाही. यामुळेच सरकारने STT चे दर वाढवले आहेत. सट्टेबाजी थांबेल की नाही माहीत नाही, पण बाजाराचा मूड नक्कीच खट्टू झाला आहे. समीर अरोरा यांच्यासारखे तज्ज्ञ शेअर बाजार आणि रुपया येत्या काही दिवसांत आणखी घसरणार असल्याचे सांगत आहेत.
'पैसा-पाणी' या विशेष सदरातील इतर महत्त्वाचे ब्लॉग वाचा
-
पैसा-पाणी: बजेट म्हणजे नेमकं काय?
-
पैसा-पाणी: चांदीची 'चांदी का होत आहे?
-
पैसा-पाणी: IT कंपन्यांनी नोकऱ्या देणे का केलं बंद?
-
पैसा-पाणी: शेअर बाजार का घसरला?
-
पैसा-पाणी: AI Agents म्हणजे काय?
-
पैसा-पाणी: किरकोळ गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून का काढला पळ?
-
पैसा-पाणी: AI च्या नावाखाली भुलले गुंतवणूकदार, 55000 टक्के रिटर्न्सचं काय आहे सत्य?
-
पैसा-पाणी: SIP सुरू ठेवावी की बंद करावी? गुंतवणूकदार चिंतेत!
-
पैसा-पाणी: Gemini की ChatGPT कोण आहे सगळ्यात भारी?
-
पैसा-पाणी: Google Gemini नेमकं वापरायचं कसं?
-
पैसा-पाणी: AI चा बुडबुडा फुटेल का.. कोणाचं आणि किती होईल नुकसान?
-
पैसा-पाणी: AI मुळे कोणाच्या नोकऱ्या जातील, कोणाच्या नोकऱ्या वाचतील?
-
पैसा-पाणी: ChatGPT चा नेमका कसा करायचा वापर?
-
पैसा-पाणी: AI तुम्हाला का मिळत आहे मोफत?
-
पैसा-पाणी: भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं का केलं बंद?
-
पैसा-पाणी: सोनं, चांदी की शेअर कशातून मिळेल सर्वाधिक पैसा.. संवत् 2082 मध्ये काय होईल?
-
पैसा-पाणी: TATA ग्रुपमध्ये एवढं भांडण का होत आहे?
-
पैसा-पाणी: बेरोजगारी कशी दूर होईल?
-
पैसा-पाणी: AI चा खोटेपणा पकडला गेला!
-
पैसा-पाणी: अमेरिका आणि भारतात ट्रेड डील होणार का?
-
पैसा-पाणी: तुम्हाला GST कपातीचा खरंच फायदा मिळेल का?
-
पैसा-पाणी: अमेरिकेच्या निशाण्यावर मुकेश अंबानी का आहेत?
-
पैसा-पाणी: भारताची अर्थव्यवस्था Economy Dead आहे का?
-
पैसा-पाणी: ED थेट अनिल अंबानींपर्यंत कशी पोहचली?
-
पैसा-पाणी : भारत आणि अमेरिकेतील 'ट्रेड डील' कुठे फसलीये? काय आहे डीलचा अर्थ? वाचा सविस्तर...
-
पैसा-पाणी : AI मुळे तुमची नोकरी जाणार? काय सांगतेय जगभरातली परिस्थिती?
-
पैसा-पाणी: भारताच्या GDP ची घोडदौड चौथ्या क्रमांकाच्या दिशेने, तरीही जनता गरीब का
-
पैसा-पाणी: रिझर्व्ह बँकेने दिली मोठी आणि आनंदाची बातमी!
-
पैसा-पाणी: Trump भारतात iPhone बनवण्याविरोधात का?
-
पैसा-पाणी: भारत-पाक तणाव, शेअर बाजाराचं काय होईल?
-
पैसा-पाणी: तुमची SIP सुरू ठेवा... कारण तुम्हीच आहात बाजाराचे खरे Hero!
-
पैसा-पाणी: एलॉन मस्कची डोकेदुखी वाढली... Tesla च्या नफ्यात घट, ट्रम्प यांच्यासाठी काम करणं पडलं महागात!
-
पैसा-पाणी: UPI वारंवार का होतं डाऊन?, पैसा हेच कारण!
-
पैसा-पाणी: बॉन्ड बाजाराच्या दबावामुळे माघार, डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणून घेतला यू-टर्न?
-
पैसा-पाणी : संकटात संधी! ट्रंप यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारतासाठी नवे दरवाजे उघडण्याची शक्यता
-
पैसा-पाणी: भारतीयांना सोन्याचं व्यसन, सरकारने मानली हार.. 3 मोठ्या योजना अपयशी!
