पैसा-पाणी: Trump भारतात iPhone बनवण्याविरोधात का?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी iPhone भारतात बनवू नका असं आवाहन Apple कंपनीला केलं आहे. पण असं असलं तरी हे तूर्तास तरी शक्य नाही. का ते आपण सविस्तर जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

पैसा-पाणी Blog
पैसा-पाणी Blog
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ट्रम्प यांनी Apple कंपनीच्या CEO ला सांगितलं iPhone भारतात बनवू नका

point

ट्रम्प यांची इच्छा कंपनी पूर्ण करू शकतं का?

point

भारतातून Apple चा प्लँट जाणार?

भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढलेला असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात iPhone बनवण्यावर वक्तव्य केले. त्यांनी Apple चे CEO टिम कुक यांना सांगितले की, “iPhone भारतात बनवू नका. जर फक्त भारतीय बाजारासाठी बनवत असाल, तर ठीक आहे. पण ते iPhone अमेरिकेत विकू नका. अमेरिका बाजारासाठी iPhone अमेरिकेतच तयार करा.” चला, iPhone प्रकरण काय आहे हे समजून घेऊया.

“चीन प्लस वन" रणनीती

Apple ही अमेरिका देशातील नफ्याने आणि मार्केट कॅपने दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. पण तिचा सर्वात यशस्वी प्रॉडक्ट – iPhone – अमेरिकेत बनत नाही. 2020 पर्यंत सर्व iPhone चीनमध्ये बनत होते. अमेरिकेने चीनवर टॅरिफ वाढवले आणि कोविड लॉकडाउननंतर अनेक कंपन्यांनी चीनवरील अवलंबन कमी करणे सुरू केले. त्यातून “चीन प्लस वन” ही रणनीती तयार झाली. 

म्हणजेच चीनसोबत इतर देशांतही उत्पादन सुरू करणे. याचा परिणाम असा की सध्या 80% iPhone चीनमध्ये आणि 20% भारतात तयार होतात. पुढच्या वर्षी भारतातील उत्पादन 25% वर नेण्याचा Apple चा विचार आहे.

भारतात 5 कोटी iPhone

Apple ला आकर्षित करण्यासाठी भारत सरकारने PLI (Performance Linked Incentive) योजना सुरू केली. विक्रीच्या प्रमाणात सरकार कंपन्यांना थेट प्रोत्साहन देते. भारतात उत्पादन महाग पडते, हे आधी कंपन्यांचे म्हणणे होते. PLI योजनेने ही तफावत कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी, आज भारतात दरवर्षी सुमारे 5 कोटी iPhone तयार होतात. पाच वर्षांपूर्वी हेच उत्पादन काही लाखांवर होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp