बांगडीच्या तुकड्यामुळे सापडला खुनी, अपमान केल्याने मोलकरणीने केली वृद्ध मालकिणीची हत्या

मुंबई तक

Crime News : सुरुवातीला ही घटना लुटीच्या उद्देशाने झाल्याचे भासवण्यासाठी आरोपींनी मयत महिलेच्या कानातील सोन्याचे टॉप्स काढून घेतले होते. मात्र, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना तिथे काचेच्या बांगडीचा एक तुकडा सापडला. संशयावरून जेव्हा नोकराणीची चौकशी करण्यात आली, तेव्हा तिच्या हातातील बांगड्यांचा रंग आणि घटनास्थळी सापडलेला तुकडा तंतोतंत जुळला. या एका पुराव्यामुळे बनाव उघड झाला.

ADVERTISEMENT

Crime NewsCrime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बांगडीच्या तुकड्यामुळे सापडला खुनी

point

अपमान केल्याने मोलकरणीने केली वृद्ध मालकिणीची हत्या

Crime News : खोया मंडी परिसरात 25 फेब्रुवारीच्या रात्री 65 वर्षीय किरण पुरवार यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. दरम्यान, उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात या खळबळजनक हत्याकांडाचा खुलासा झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही हत्या त्यांच्याच जुन्या मोलकरणीने आपल्या मुलाच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

नेमकं हत्याप्रकरण काय आहे? 

मयत किरण पुरवार या अर्धांगवायूच्या (पॅरालिसिस) रुग्ण होत्या. त्या पूर्णपणे आशा रैकवार या मोलकरणीच्या सेवेवर अवलंबून होत्या. 25 फेब्रुवारीच्या रात्री किरण यांचे पती संतोष पुरवार हे त्यांच्या किराणा दुकानावर गेले होते. हीच संधी साधून मोलकरणीने (आशा) आणि तिचा 27 वर्षीय मुलगा सोनू यांनी घरात प्रवेश केला आणि उशीने तोंड दाबून किरण यांची निर्घृण हत्या केली.

हेही वाचा : लग्न झाल्यानंतरही एक्स बॉयफ्रेंड त्रास द्यायचा, शेवटी तरुणीने घरी बोलवून केला खून, ओळख पटू नये म्हणून ॲसिड फेकलं

हत्येमागचे कारण: वारंवार होणारा अपमान

पोलीस अधिकारी अरुण कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण पुरवार या आजारपणामुळे त्रस्त होत्या आणि कामात चूक झाल्यास त्या आशाला वारंवार हटकत असत. काही वेळा त्यांच्याकडून अपशब्दांचा किंवा शिवीगाळीचाही वापर होत असे. सतत होणाऱ्या या अपमानाचा बदला घेण्यासाठी आशाने आपल्या मुलासह किरण यांना वाटेतून हटवण्याचा कट रचला.

हे वाचलं का?

    follow whatsapp