प्रेयसीचे लग्न ठरले, 18 वर्षीय तरुणाने जीवन संपवले; आत्महत्येपूर्वी प्रेयसीसाठी केली 'ही' सोशल मीडिया पोस्ट

मुंबई तक

Crime News : एका 18 वर्षीय तरुणाने प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केली. शुभम यादव असे या मृत तरुणाचे नाव असून तो बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. मंगळवारी रात्री राहत्या घराजवळील बागेत आंब्याच्या झाडाला फास लावून त्याने आपले जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रेयसीचे लग्न ठरले, 18 वर्षीय तरुणाने जीवन संपवले

point

आत्महत्येपूर्वी प्रेयसीसाठी केली 'ही' खास पोस्ट

Crime News : एका 18 वर्षीय तरुणाने प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केली. शुभम यादव असे या मृत तरुणाचे नाव असून तो बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. मंगळवारी रात्री राहत्या घराजवळील बागेत आंब्याच्या झाडाला फास लावून त्याने आपले जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबी परिसरातील ही घटना आहे.

हे ही वाचा : कल्याण: "आई-बाबा त्रास करून घेऊ नका..." बारावीच्या परीक्षेच्या भितीने 17 वर्षीय विद्यार्थीनीने संपवलं आयुष्य!

नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, शुभमचे चरवा पोलीस स्टेशन हद्दीतील एका तरुणीवर गेल्या अनेक दिवसांपासून प्रेम होते. मात्र, तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या ठिकाणी निश्चित केले होते. मंगळवारी त्या तरुणीची वरात येणार असल्याची माहिती शुभमला मिळाली आणि तो प्रचंड मानसिक धक्क्यात गेला. या नैराश्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले.

आत्महत्येपूर्वी सोशल मीडिया पोस्ट

आत्महत्या करण्यापूर्वी शुभमने सोशल मीडियावर त्या तरुणीसोबतचा आपला फोटो पोस्ट केला होता. या फोटोसोबत त्याने, "तुलाही घेऊन जाऊ, मलाही घेऊन जाऊ, तुला स्वीकारू आणि स्वत:ला गाडून घेऊ," (तुमको भी ले जाएंगे, हमको भी ले जाएंगे, तुमको अपनाएंगे, हमको दफनाएंगे) अशी भावूक आणि सूचक ओळ लिहिली होती. ही पोस्ट टाकल्यानंतर काही वेळातच त्याने बागेत जाऊन गळफास घेतला.

हे वाचलं का?

    follow whatsapp