कल्याण: "आई-बाबा त्रास करून घेऊ नका..." बारावीच्या परीक्षेच्या भितीने 17 वर्षीय विद्यार्थीनीने संपवलं आयुष्य!

मिथिलेश गुप्ता

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात बारावीची विद्यार्थीनी असलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

बारावीच्या परीक्षेच्या भितीने 17 वर्षीय विद्यार्थीनीने संपवलं आयुष्य!
बारावीच्या परीक्षेच्या भितीने 17 वर्षीय विद्यार्थीनीने संपवलं आयुष्य!
google news

बातम्या हायलाइट

point

बारावीच्या परीक्षेच्या भितीने 17 वर्षीय विद्यार्थीनीने संपवलं आयुष्य!

point

कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना

कल्याण: कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात बारावीची विद्यार्थीनी असलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अक्षरा नितीन रेणुसे अशी मृत तरुणीची ओळख असून बुधवारी (25 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. परीक्षेच्या भितीमुळे आणि अपयशाच्या मानसिक दडपणामुळे तरुणीने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

घरातील पोटमाळ्यावर गळफास घेऊन आत्महत्या 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अक्षरा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात 12 वी कॉमर्स शाखेत शिक्षण घेत होती. सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षांमध्ये आपण उत्तीर्ण होणार नाही, आपल्याला अपयश येईल, अशी भिती तिच्या मनात निर्माण झाली होती. याच मानसिक तणावातून अक्षराने तिच्या घरातील पोटमाळ्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. हा भयानक प्रकार कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर तिला तातडीने खाली उतरवण्यात आलं, मात्र त्यावेळी तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. 

हे ही वाचा: नागपूर : भाचा बेडरुममध्ये शिरला अन् मामीसोबत केले नको तेच, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं? 

आत्महत्या करण्यापूर्वी अक्षराने एक चिट्ठी (सुसाईड नोट) लिहून ठेवली होती. त्या चिट्ठीत तिने आपल्या पालकांविषयी भावना व्यक्त करत "आई-बाबा, यापुढे मी तुम्हाला त्रास देणार नाही, मी गेल्यावर आई-बाबा त्रास करून घेऊ नका..." असा मजकूर लिहिला होता. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, ही घटना केवळ परीक्षेच्या भीतीमुळे घडली की यामागे इतर काही वैयक्तिक कारणे आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. 

हे ही वाचा: पतीला मुलगाच हवा होता... रागाच्या भरात दोन महिन्यांच्या गर्भवती पत्नीसह तीन मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या!

12 वी परीक्षेच्या भितीमुळे आत्महत्या

तरुणीने 12 वी परीक्षेच्या भितीमुळे आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच, एका तरुणाने रेबीज होण्याच्या भीतीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता परीक्षेच्या भीतीतून विद्यार्थिनीने उचललेल्या या पावलामुळे तरुण वर्गातील वाढत्या मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

हे वाचलं का?