'प्रधान हटवून यांनी पंतप्रधान वाचवला' अखिलेश यांचे भाषणात टॉन्ट, डिंपलही हसल्या
akhilesh yadav parliament speech : संसदेत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी युवकांच्या आंदोलनाबाबतच्या सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. त्यांच्या भाषणात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यासह विविध विषयांवर सरकारला लक्ष्य करण्यात आले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'प्रधान हटवून यांनी पंतप्रधान वाचवला'
अखिलेश यांचे भाषणात टॉन्ट, डिंपलही हसल्या
akhilesh yadav parliament speech : संसदेत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत शिक्षण व्यवस्था, पेपरफुटी, युवकांचे आंदोलन आणि मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी आंदोलनादरम्यान दिल्या गेलेल्या घोषणांचा उल्लेख करत सरकारला युवकांसमोर झुकावे लागल्याचा दावा केला. सरकार झुकत नाही असा समज होता, मात्र नव्या पिढीने सरकारलाही झुकवता येते हे दाखवून दिल्याचे ते म्हणाले. युवकांनी संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि सरकारने ती मान्य केल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारने सभागृहात झालेल्या आश्वासनांची माहितीही द्यावी, अशी मागणी केली. मंत्री पदावरून परतल्यानंतर झालेल्या स्वागतावरही त्यांनी टोला लगावत, एका मंत्र्याला हटवून पंतप्रधानांना मोठ्या संकटातून वाचवण्यात आल्याची उपरोधिक टिप्पणी केली.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा यलो-ऑरेंज अलर्ट, 'या' जिल्ह्यांवर आस्मानी संकट
2024 मध्ये कायदा आणल्यानंतरही 2026 मध्ये पेपरफुटी कशी झाली?
यानंतर अखिलेश यादव यांनी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी विचारले की, 2024 मध्ये कायदा आणल्यानंतरही 2026 मध्ये पेपरफुटी कशी झाली? त्यांच्या मते हा केवळ विद्यार्थ्यांचा नव्हे तर पालकांचाही मोठा प्रश्न बनला होता. लाखो विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही या प्रकरणाचा फटका बसल्याचा दावा त्यांनी केला. आंदोलनात युवकांसोबत पालकही सहभागी झाल्यामुळे हे अभूतपूर्व आंदोलन ठरल्याचे ते म्हणाले. सरकारने कायदे केले असले तरी त्यातून पेपरफुटी थांबली नसल्याचा आरोप करत त्यांनी विविध भरती परीक्षा, शिक्षक भरती, यूपीटीईटी, नीट, पोलीस भरती, सहाय्यक प्राध्यापक भरती आणि इतर अनेक परीक्षांच्या पेपरफुटीची उदाहरणे सभागृहात मांडली. केवळ कायदा करून प्रश्न सुटत नसून जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : 'मोदींनी कॅमेऱ्याचा नाही मनाचा अँगल बदलावा..', प्रियांका गांधींची लोकसभेत तुफान फटकेबाजी
