Maharashtra Weather : राज्यात पावसाचा यलो-ऑरेंज अलर्ट, 'या' जिल्ह्यांवर आस्मानी संकट

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात कुठे ऑरेंज तर कुठे पावसाच्या यलो अलर्टच्या अंदाजाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची परिस्थिती निर्माण झाल्याची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात 29 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानचा अंदाज. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्याला पावसाचा ऑरेंज, यलो अलर्टचा अंदाज

point

29 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानचा अंदाज घ्या जाणून

Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कुठे ऑरेंज तर कुठे पावसाच्या यलो अलर्टच्या अंदाजाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची परिस्थिती निर्माण झाल्याची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात 29 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानचा अंदाज. 

हे ही वाचा : कराड: नीट परीक्षेत अपयश, विद्यार्थीनीनं उंदीर मारण्याच्या वड्या खाऊन संपवलं जीवन

कोकण

कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विभागात मान्सूनच्या यलो अलर्टचा अंदाज आहे. तर मुंबईत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाटमाथा परिसर, कोल्हापूर घाटमाथा परिसर, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. कोल्हापूरमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.