'तिच्या पोटात दुखत होतं...' नवऱ्यानं 'त्या' संशयामुळे बायकोला संपवलं

मुंबई तक

चारित्र्याच्या संशयावरुन एका पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. मात्र पोलिसांनी चकवा देण्यासाठी त्याने एक बनाव रचला. गुरुग्राममधील ही घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

तिच्या पोटात दुखत होतं...

point

नवऱ्यानं 'त्या' संशयामुळे बायकोला संपवलं

Crime News : चारित्र्यावर संशय घेऊन 21 वर्षांच्या पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना गुरुग्राममध्ये उघडकीस आली आहे. हत्येनंतर आरोपीने पत्नीचा मृत्यू पोटदुखीमुळे झाल्याचा बनाव रचून पोलिसांची आणि नातेवाईकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेहावरील जखमांच्या खुणांमुळे त्याचा हा प्रयत्न फसला असून गुरुग्राम पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

पोटदुखीमुळे मृत्यू, मात्र...

मिळालेल्या माहितीनुसार, शालू असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती हेमंत याने सोमवारी (27 जुलै) तिला रुग्णालयात आणले होते, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सुरुवातीला हेमंतने पोलिसांसमोर पत्नीचा मृत्यू पोटदुखीमुळे झाल्याचा दावा केला. मात्र, पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता तिच्या मानेवर संशयास्पद जखमांच्या खुणा आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ मृत महिलेच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.

हे ही वाचा : प्रियंका गांधींनी 'ते' प्रकरण काढताच नव्या शिक्षणमंत्र्यांसह सगळेच भिडले, का?

2025 मध्ये विवाह

शालूच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीचा विवाह 2025 मध्ये हेमंतसोबत झाला होता. दोघेही मजुरीचे काम करत असून बेहलपा ग्रीन फार्म हाऊसजवळ राहत होते. 26-27 जुलैच्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हेमंतने फोन करून शालूच्या पोटात त्रास होत असल्याचे व तिला रुग्णालयात नेत असल्याचे सांगितले आणि नंतर तिचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. रुग्णालयात पोहोचल्यावर मानेवरील खुणा पाहून कुटुंबीयांनी हेमंतवर हत्येचा आरोप केला, ज्यावरून भोंडसी पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला.

हे ही वाचा : पत्नीशी अफेअर, नोकराने केली मालकाची हत्या; 200 मीटर दूर गाडलं शीर

'अशी' केली हत्या

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या हेमंतला पोलिसांनी मंगळवारी गुरुग्राममधून अटक केली. चौकशीदरम्यान त्याने चरित्रावर संशय असल्याने 26-27 जुलैच्या मध्यरात्री पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली ओढणी पोलिसांनी जप्त केली असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती गुरुग्राम पोलीस प्रवक्त्याने दिली आहे.