चार वर्षांच्या मुलाचं अपहरण करुन अत्याचाराचा प्रयत्न, आरडाओरडा करताच डोकं दगडानं ठेचलं; हादरवून टाकणारं प्रकरण

मुंबई तक

Crime News : एका चार वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. या मुलाचे एका व्यक्तीने अपहरण करुन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने आरडाओरडा करताच त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चार वर्षांच्या मुलावर अत्याचाराचा प्रयत्न

point

आरडाओरडा करताच डोकं दगडानं ठेचलं

point

हादरवून टाकणारं प्रकरण

Crime News : झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. येथील खूंटपानी भागात सुरुवातीला मुलांच्या चोरीची अफवा वाटणारी घटना प्रत्यक्षात एका चार वर्षांच्या निष्पाप बालकाचे अपहरण आणि अत्यंत निर्घृण हत्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 26 फेब्रुवारी रोजी बालेमा हेम्ब्रम यांनी आपला मुलगा निर्मल बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीचे गांभीर्य ओळखून पश्चिम सिंगभूमच्या पोलीस अधीक्षकांनी तातडीने एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू केला.

हे ही वाचा : विवाहित प्रेयसीने मध्यरात्री घरी भेटायला बोलवलं... पण सकाळी 'त्या' अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह!

अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न

तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी चक्रधरपूरमधील देवेंद्र बोदरा नावाच्या संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत आरोपीने आपला गुन्हा मान्य केला, ज्यामुळे या प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर आले. आरोपीने अवघ्या चार वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण केले होते. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याने मुलाला एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या निष्पाप मुलाने या कृत्याला विरोध केला आणि आरडाओरडा सुरू केला.

दगडाने ठेचले डोके

स्वतःचे कृत्य उघड होईल या भीतीने आरोपी देवेंद्र बोदरा याने क्रूरतेची सीमा ओलांडली. मुलाचा आवाज दाबण्यासाठी त्याने जवळच असलेला एक मोठा दगड उचलला आणि त्या चार वर्षांच्या मुलाचे डोके दगडाने ठेचून त्याची जागीच हत्या केली. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोध मोहीम राबवून मुलाचा मृतदेह आणि रक्ताने माखलेला तो दगड हस्तगत केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp