महिलेचं टक्कल केलं, ग्रामस्थांसमोर कपडे फाडले, नवऱ्याला खांद्यावर बसवून गावभर फिरण्यास भाग पाडले
crime news : आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याने एका 32 वर्षीय महिलेला शिक्षा सुनावण्यात आली होती, ज्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. तिच्यावर हल्ला करत तिचा सन्मान देखील हिरावून घेतल्याची घटना आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सासरा पीडितेचा छळ करायचा म्हणून ती प्रियकरासोबत राहू लागली
ग्रामस्थांसमोर पीडितेचे कपडे फाडले, नंतर केस कापले
Crime News : मध्य प्रदेशातील आदिवासीबहुल जिल्हा झाबुआ येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याने एका 32 वर्षीय महिलेला शिक्षा सुनावण्यात आली होती, ज्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. तिच्यावर हल्ला करत तिचा सन्मान देखील हिरावून घेतल्याची घटना आहे.
हे ही वाचा : डोळ्यात अंगार, नामदेव ढसाळांचा झंझावात मोठ्या पडद्यावर, 'हा' अभिनेता साकारणार भूमिका
सासरा पीडितेचा छळ करायचा म्हणून ती प्रियकरासोबत राहू लागली
संबंधित प्रकरणात घडलेल्या घटनेनुसार, पीडितेचं लग्न हे 12 वर्षांपूर्वी झालं होतं, तसेच तिला दोन मुलं आहेत. संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, तिचा सासरा तिचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ करायचा. अत्याचाराला कंटाळून ती महिला घर सोडून तिच्या प्रियकरासोबत राहू लागली होती. मात्र, समाजातील तथाकथित कंत्राटदारांनी या प्रकरणाला मान्यता दिली नाही. त्यामुळे एक सामुदायिक बैठक बोलावण्यात आली.
ग्रामस्थांसमोर पीडितेचे कपडे फाडले, नंतर केस कापले
स्त्रीला तिच्या पतीकडे परत जाण्याचा आदेश देण्यात आले. तेव्हा ती परत गेली असता, तिला एका भयंकर छळाला समोरे जावे लागले होते. गर्दीसमोर तिचे कपडे फाडण्यात आले आणि तिचे केस कापण्यात आले. हा छळ इथेच न थांबता नाही; शिक्षा म्हणून, त्या स्त्रीला तिच्या पतीला खांद्यावर बसवून गावातून चालायला लावले. काही लोकांनी याचे चित्रीकरण देखील केले होते, आता ते सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रतिपाल सिंग महोबिया यांनी सांगितलं की, संबंधित घटना ही 12 एप्रिल रोजी रात्री काकनवाणी पोलीस ठाणे परिसरातील एका गावात घडली. पोलिसांनी या प्रकरणात 10 जणांविरुद्ध एफआरआय दाखल केला, पतीसह चार जणांना अटक केली आहे.









