22 वर्षीय विद्यार्थिनीवर पुलाखाली गँगरेप, पोलिसांनी पीडितेलाच तीन दिवस बसवले पोलिस स्टेशनमध्ये; नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

पीडित तरुणी घरापासून लांब राहून शिक्षण घेते. त्याठिकाणी शेजारी राहणाऱ्या राहुल चौधरी या 18 वर्षीय तरुणाने तिला एकटी पाहून पिस्तूलाचा धाक दाखवून अत्याचार केला. यावेळी तिला लग्नाचे आश्वासन देऊन शांत केले. या घटनेनंतर घाबरलेली तरुणी आपल्या मूळ गावी परतली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

22 वर्षीय विद्यार्थिनीवर पुलाखाली गँगरेप,

point

पोलिसांनी पीडितेलाच तीन दिवस बसवले पोलिस स्टेशनमध्ये

point

नेमकं प्रकरण काय?

Crime News : एका 22 वर्षीय तरुणीवर पिस्तूलाचा धाक दाखवून बलात्कार केल्याची आणि त्यानंतर बळजबरीने लग्नाचे नाटक करुन सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी घरापासून लांब राहून शिक्षण घेते. त्याठिकाणी शेजारी राहणाऱ्या राहुल चौधरी या 18 वर्षीय तरुणाने तिला एकटी पाहून पिस्तूलाचा धाक दाखवून अत्याचार केला. यावेळी तिला लग्नाचे आश्वासन देऊन शांत केले. या घटनेनंतर घाबरलेली तरुणी आपल्या मूळ गावी परतली. झारखंडच्या गढवा परिसरातील ही घटना आहे. 

नदीच्या पुलाखाली सामूहिक बलात्कार

ही भयानक घटना येथेच थांबली नाही. 4 एप्रिल रोजी पीडितेचे पालक घरी नसताना आरोपी राहुल चौधरी आणि त्याचा मेहुणा आलोक चौधरी यांनी तरुणीचे अपहरण केले. तिला पलामू जिल्ह्यातील विश्रामपूर येथे नेऊन, आरोपीच्या बहिणीच्या उपस्थितीत जबरदस्तीने सिंदूर भरून लग्नाचा बनाव रचला. त्यानंतर तिला पुन्हा तिच्या गावी घेऊन जाताना वाटेत गढवा शाहपूर मार्गावरील तहले नदीच्या पुलाखाली नेऊन, राहुल आणि त्याच्या मेहुण्याने तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. गावी पोहोचल्यावर संतापलेल्या ग्रामस्थांनी त्यांना घेराव घातला, तेव्हा आरोपीचा मेहुणा पळून गेला, परंतु राहुल पोलिसांच्या ताब्यात सापडला.

हे ही वाचा : भाजप नेता असल्याचा दावा, 16 वर्षीय मुलीवर 19 वेळा लैंगिक अत्याचार अन्...

पीडितेला पोलिस ठाण्यात ठेवले डांबून

या गंभीर प्रकरणात पीडितेने पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पीडिता आणि आरोपीला ताब्यात घेतले, मात्र एफआयआर नोंदवण्याऐवजी किंवा वैद्यकीय तपासणी करण्याऐवजी पोलिसांनी पीडितेला तब्बल तीन दिवस पोलीस ठाण्यातच डांबून ठेवले. इतकेच नाही तर, 'आरोपीसोबत तुझे चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते,' असा खोटा जबाब देण्यासाठी पोलीस तिची मानसिक छळवणूक करत असल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. संशयास्पद रित्या पोलिसांनी आरोपी राहुलला सोडून दिले आणि पीडितेला गढवा येथील आश्रयगृहात पाठवून दिले.

हे ही वाचा : सख्ख्या मामाने चार वर्षांच्या भाचीला निर्घृणपणे संपवले, कारखाली मृतदेह टाकून झाला फरार; नेमकं कारण काय?

पीडितेची विधी प्राधिकरणाकडे धाव

न्यायासाठी आता पीडितेने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे धाव घेतली असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची आणि स्वतःच्या सुरक्षेची मागणी केली आहे. तिचे मोबाईल फोनही आरोपींनी फोडले असून, ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलीस प्रशासनाने मात्र सुरुवातीच्या तपासात हे प्रेमप्रकरणाचे प्रकरण असल्याचे सांगत अधिकृत कारवाईचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे 'वर्दीला लागलेला हा डाग' धुवून काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
 

हे वाचलं का?