तरुणाच्या तोंडात बोळा कोंबून केली हत्या, झुडपात आढळला मृतदेह, हातावर 'राजीव' अन् छातीवर 'स्नेहा'...

मुंबई तक

Crime News : एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. एवढंच नाहीतर तपासादरम्यान मृताच्या तोंडात कपडा कोंबलेला आढळून आला होता. गळा दाबल्यानं काही बोटांचे ठसे देखील उमटलेले आढळून आले होते, यामुळे तरुणाची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. 

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मृत तरुणाच्या दंडावर राजू नाव आणि छातीवर स्नेहा...

point

ओळखीच्याच तरुणांनी गळा दाबून केली हत्या

Crime News : हरियाणाच्या यमुनानगर ठाणे क्षेत्रातील तीर्थनगर रेल्वेमार्गावर एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. एवढंच नाहीतर तपासादरम्यान मृताच्या तोंडात कपडा कोंबलेला आढळून आला होता. गळा दाबल्यानं काही बोटांचे ठसे देखील उमटलेले आढळून आले होते, यामुळे तरुणाची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : विवाहित प्रेयसीने मध्यरात्री घरी भेटायला बोलवलं... पण सकाळी 'त्या' अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह!

मृत तरुणाच्या दंडावर राजू नाव आणि छातीवर स्नेहा...

संबंधित प्रकरणात रविवारी सकाळी 11 वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच रेल्वे लाईन नजीक असलेल्या काही झाडांमध्ये मृतदेह पडलेला आढळून आला होता. पोलिसांनी तपास करून मृतदेह ताब्यात घेतला. मृत्यू झालेल्या तरुणाच्या दंडावर राजू आणि छातीवर स्नेहा असं लिहिलं होतं. 

ओळखीच्याच तरुणांनी गळा दाबून हत्या केली

गुन्हेगारी पथकाने घटनास्थळी तपासणी केली, मृताचा एका पायातील बूट घटनास्थळावरील काही अंतरावर आढळला होता. तर दुसऱ्या पायात होता. तसेच मारहाणीच्या खुणा देखील आढळून आल्या होत्या. यावरून असे दिसून आले की, ओळखीच्या लोकांनी त्या तरुणाला आणले आणि त्याचा गळा दाबून हत्या केली. 

हे ही वाचा : पुणे : पिंपरी-चिंचवडमधील 84 विद्यार्थी दुबईत अडकले, इराणने दुबईवर केलेल्या हल्ल्याचा फटका

तोंडात कापडाला बोळा कोंबला

तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, आवाज येऊ नये म्हणून त्याच्या तोंडात कापडाला बोळा कोंबण्यात आला होता. सदर यमुनानगर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी प्रदीम कुमार म्हणाले की,मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp