इंटरनेटचा काळा बाजार: "ऑनलाइन साइट्सवर महिलांना पिझ्झासारखं विकलं जातंय...", पीडितांचे हृदयद्रावक अनुभव
इंटरनेटचं जग जितकं सोयीस्कर आहे तितकेच ते भयानक आहे. नुकतंच, 'इंडिपेंडेंट अँटी-स्लेव्हरी कमिशनर' (IASC) ने प्रदर्शित केलेल्या एका अहवालामुळे संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की आजच्या डिजिटल युगात, हजारो महिला ऑनलाइन वेबसाइटवर पिझ्झासारख्या विकल्या जात आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"ऑनलाइन साइट्सवर महिलांना पिझ्झासारखं विकलं जातंय..."
इंटरनेटचा काळा बाजार...
पीडित महिलांचे हृदयद्रावक अनुभव
Crime News: इंटरनेटचं जग जितकं सोयीस्कर आहे तितकेच ते भयानक आहे. नुकतंच, 'इंडिपेंडेंट अँटी-स्लेव्हरी कमिशनर' (IASC) ने प्रदर्शित केलेल्या एका अहवालामुळे संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की आजच्या डिजिटल युगात, हजारो महिला ऑनलाइन वेबसाइटवर पिझ्झासारख्या विकल्या जात आहेत. या वेबसाइट्सच्या माध्यमातून निर्भयपणे महिलांचा व्यापार केला जातो आणि त्यांचा वापर करून लाखो रुपये कमवले जातात. सर्वात भयानक म्हणजे, मुलांना या वेबसाइट्सवर प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी कोणतेही कठोर उपाय नाहीत, ज्यामुळे निष्पाप मुले देखील धोक्यात येतात.
पीडितांनी व्यक्त केल्या भावना
या प्रकरणातील एका पीडितेने आपल्या वेदना व्यक्त करताना म्हटलं की, "जर एका ग्राहकाने मला मारून टाकलं तर किमान माझ्या शरीराची ओळख पटेल म्हणून मी माझ्या शरीरावर टॅटू काढले." तर दुसऱ्या महिलेने म्हटले की, "पुरुष बाहेर जाऊन पिझ्झा मागवल्याप्रमाणे महिला खरेदी करत आहेत आणि हे समाजासाठी लाजिरवाणे आहे." अहवालानुसार, आयुक्त कार्यालयाने अशा 12 वेबसाइट्सवरील सुमारे 63,000 जाहिरातींचं विश्लेषण केलं आणि दहापैकी सहा जाहिरातींमध्ये तस्करी आणि शोषण स्पष्टपणे दर्शवलं गेल्याचं आढळून आलं. या वेबसाइट्सवर गुन्हेगार एकाच वेळी अनेक महिलांवर नियंत्रण ठेवतात. ग्राहक त्यांची ओळख लपवून वेबसाइट बघतात आणि महिलांना वस्तूप्रमाणे निवडतात. धक्कादायक म्हणजे, फक्त एका महिन्यात 4 कोटींहून अधिक लोकांनी या 12 वेबसाइट्सना भेट दिली.
हे ही वाचा: मुंबईची खबर: प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी मध्य रेल्वेचे प्रयत्न! आता, रेल्वे स्थानकांवर नवीन सुविधा...
"आधुनिक काळातील गुलाम बाजार"
बऱ्याच प्रकरणांमध्ये, गुन्हेगार स्वतः महिलांच्या वेशात क्लायंटशी संवाद साधतात आणि सौदा करतात. पीडितांनी सांगितले की या प्लॅटफॉर्मवर कोणतीही सुरक्षा नाही. जर एखाद्या महिलेने क्लायंटला भेटण्यास नकार दिला तर तिला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिली जाते. गेल्या वर्षापासून, या वेबसाइट्स बंद करण्याचे आवाहन केले जात आहे. संसदेत असा कायदा आणला जात आहे जो न्यायालयांना या वेबसाइट्स निलंबित करण्याची परवानगी देईल. मिया डी फाओइट नावाच्या एका सर्व्हाइवरने त्याचं वर्णन "आधुनिक काळातील गुलाम बाजार" असं केलं आहे, जिथे सुपरमार्केटप्रमाणेच कोणत्याही वयोगटातील किंवा वंशाची महिला निवडता येतात.
हे ही वाचा: Govt Job: सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! IBPS कडून मोठी भरती; 17 लाखांचं पॅकेज अन्...
तस्करीच्या बळी पडलेल्या महिलांना मदत करणारी ग्लासगो येथील संस्था TARA माहितीनुसार, या वेबसाइट्सवर जाहिरात करणाऱ्या महिला अनेकदा बेघर आणि मानसिक आघातग्रस्त असतात. या व्यवसायातून त्यांना कधीही नफा मिळत नाही, उलट सर्व पैसे मध्यस्थ आणि गुन्हेगारांच्या खिशात जातात. आता आयुक्तांनी सरकारने या साइट्सवर वय पडताळणी अनिवार्य करावी, ऑनलाइन सुरक्षा कायदे मजबूत करावेत आणि या व्यवसायातून नफा मिळवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.










