मुलगी घरी एकटीच असताना बारावीचा मुलगा घरात शिरला, मैत्रिणीच्या वडिलांनी पाहताच...

मुंबई तक

Crime news : बारावी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या 17 वर्षीय मुलाने आपल्या मैत्रिणीच्या घरी जाऊन गळफास घेत जीवन संपवलं. घटनेदरम्यान मुलीच्या वडिलांनी त्याला घरातच थांबवले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत्यूची नोंद केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. 

ADVERTISEMENT

Crime news
Crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुलगी घरी एकटी असताना मुलगा घरी आला...

point

वडिलांनी बघताच दोघांना फटकारले, नंतर मुलाने साडीने गळफास घेत जीवन संपवलं

Crime news : बारावी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या 17 वर्षीय मुलाने आपल्या मैत्रिणीच्या घरी जाऊन गळफास घेत जीवन संपवलं. घटनेदरम्यान मुलीच्या वडिलांनी त्याला घरातच थांबवले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत्यूची नोंद केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. संबंधित मुलगी ही इयत्ता दहावीमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना गुजरातमधील अहमदाबादमधील चिलोडा परिसरात घडल्याचे वृत्त आहे. 

मुलगी घरी एकटी असताना मुलगा घरी आला...

टाइम्स ऑफ इंडियानुसार, पोलिसांनी सांगितले की, मृत विद्यार्थी आणि त्याची प्रेयसी दोघेही दहावीचे विद्यार्थी होते. शनिवारी मुलगी घरी एकटी असताना, तिचे वडील तिच्या आईला बघण्यासाठी रुग्णालयात गेले होते. अशातच जवळच राहणारा मुलगा तिला भेटण्यासाठी घरी आला होता. 

वडिलांनी बघताच दोघांना फटकारले, नंतर मुलाने साडीने गळफास घेत जीवन संपवलं

या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, मुलीचे वडील अचानक घरी गेले आणि मुलाला पाहून दोघांनाही फटकारले. नंतर त्यांनी आपल्या मुलीला बाहेर जाण्यास सांगितले, त्यानंतर मुलीला एका खोलीत बंद केले आणि त्याच्या कुटुंबाला बोलावले. त्याचदरम्यान मुलाने साडीने गळफास घेत जीवन संपवल्याचा आरोप आहे. 

हे ही वाचा : बॉयफ्रेंडने निर्जनस्थळी नेऊन अत्याचार करुन गेला, पीडितेच्या मदतीसाठी आलेल्या तरुणानेही अब्रू लुटली, शेवटी केला मर्डर

हे वाचलं का?

    follow whatsapp