पैसा-पाणी: तुमची SIP सुरू ठेवा... कारण तुम्हीच आहात बाजाराचे खरे Hero!

काही महिन्यांपूर्वीच भारतीय शेअर बाजारात ऐतिहासिक विक्री झाली. पण असं असूनही शेअर बाजारात केवळ 2 ते 3 टक्क्यांची घसरण झाली. जी गोष्ट खरोखर आश्चर्यचकीत करणारी आहे. पण हे नेमकं झालं कशामुळे?

ADVERTISEMENT

पैसा-पाणी: विशेष ब्लॉग
पैसा-पाणी: विशेष ब्लॉग
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारताचा ‘आत्मनिर्भर’ शेअर बाजार!

point

87 हजार कोटींची विक्री आणि तरीही बाजार फक्त 2% घसरण?

point

कोणामुळे भारतीय शेअर बाजारा सावरला?

2008 साली अमेरिकन आर्थिक संकट आलं तेव्हा FII — म्हणजे परदेशी गुंतवणूकदार. यांनी 16 हजार कोटींच्या शेअर्स विकले होते आणि शेअर बाजार तब्बल 25 टक्क्यांनी घसरला होता. पण यावर्षी जानेवारीत त्यांनी याच्या पाच पट म्हणजे तब्बल 87 हजार कोटी शेअर्सची विक्री केली, तरी बाजार फक्त 2 ते 3 टक्केच खाली आला. शेअर बाजारात एवढी मोठी विक्री झाली तरी बाजारात इतकी कमी घसरण का झाली, आता नेमकं काय बदललं?

तर उत्तर आहे – तुमची SIP.

SIP ने भारताच शेअर मार्केट तारलं!

हो, दर महिन्याला हजार-दोन हजाराच्या SIP ने काय फरक पडतो असं  आपल्याला वाटतं. पण देशभरात लाखो गुंतवणूकदार हेच करत आहेत. त्यांचा देखील असाच विचार असतो. त्यामुळे म्युच्युअल फंडांसारखे DII — म्हणजेच देशांतर्गत गुंतवणूकदार. हे आता FII पेक्षा जास्त शेअर्सचे मालक झाले आहेत.

मार्च 2025 पर्यंतच्या आकड्यानुसार, NSE वर लिस्ट असलेल्या शेअर्सपैकी 17.6% DII च्या हातात आहेत, आणि FII च्या फक्त 17.2 टक्के. 2010  मध्ये हेच प्रमाण होतं — FII 14%, DII 11%. आता गणित उलटं झालं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp