पैसा-पाणी: AI मुळे कोणाच्या नोकऱ्या जातील, कोणाच्या नोकऱ्या वाचतील?
Artificial intelligence यामुळे जगभरात कोणाकोणाच्या नोकऱ्या जातील याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कोणकोणत्या नोकऱ्यांना AI मुळे धोका आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

गेल्या आठवड्यात, मी पाकिस्तानच्या Dawn या इंग्रजी वृत्तपत्रातील एक Clip शेअर केली होती. त्या वृत्तपत्राने कार विक्रीबद्दल एक बातमी प्रकाशित केलेली. शेवटी, ChatGPT शैलीचा एक प्रॉम्प्टही छापला गेला होता. ज्यामध्ये ChatGPT म्हटलं होतं की, मी ही बातमी फ्रंट पेजसाठी बनवू का?
आता दोन शक्यता आहेत. ChatGPT ला एक प्रेस नोट दिली गेली असेल आणि त्यावरून बातमी लिहिण्यास सांगितले असेल किंवा रिपोर्टरच्या कॉपी डेस्कने ती एडिट करण्यासाठी ChatGPT ला दिली असेल. पण यासगळ्यामुळे आता वृत्तपत्राची खिल्ली उडवली जात आहे. तर आज आपण पैसा-पाणी या विशेष सदरात चर्चा करूयात नोकऱ्यांमधील AI बद्दल. AI हा आपला भागीदार होईल की त्यामुळे आपल्या नोकऱ्या जातील?
EY ने भारतातील नोकऱ्यांवर AI चा काय परिणाम होईल यावर एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, 5 वर्षांत अंदाजे 4 कोटी (38 मिलियन) नोकऱ्या बदलतील, म्हणजेच हे लोक आज जे काम करत आहेत ते आता पूर्वीसारखे राहणार नाही. याचा सर्वाधिक परिणाम तीन क्षेत्रांवर होईल. रिटेल, फायनान्स आणि आयटीमध्ये सर्वात जास्त बदल होण्याची शक्यता आहे.
मी ChatGPT ला विचारले की, कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या गमावल्या जाऊ शकतात आणि कोणत्या टिकू शकतात. हे मूल्यांकन NITI आयोग, Microsoft आणि EY सारख्या विविध संशोधन अहवालांवर आधारित आहे.










