पैसा-पाणी: ED थेट अनिल अंबानींपर्यंत कशी पोहचली?

कधी काळी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेले अनिल अंबानी यांच्या अनेक कंपन्या आता दिवाळखोरीत निघाल्या आहेत. तर आता दोन दिवसांपूर्वी त्यांच्या काही कंपन्यांवर ईडीने छापेमारी केली. जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण काय आहे.

ADVERTISEMENT

ED थेट अनिल अंबानींपर्यंत कशी पोहचली?
ED थेट अनिल अंबानींपर्यंत कशी पोहचली?
social share
google news

आज अनिल अंबानी त्यांचे मोठे भाऊ मुकेश यांच्यासमोर कोणीही स्पर्धक नाही. पण सुमारे 20 वर्षांपूर्वी दोन्ही भाऊ जवळजवळ बरोबरीत होते. 2008 मध्ये अनिल अंबानी यांची 42 अब्ज डॉलर्सची मालमत्ता होती. ते जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. तर मुकेश अंबानी हे 43 अब्ज डॉलर्ससह पाचव्या क्रमांकावर होते. आज मुकेश अंबानींची मालमत्ता सुमारे 125 अब्ज डॉलर्स आहे तर अनिल अंबानींनी स्वतःला दिवाळखोर घोषित केले आहे. पैसा-पाणीच्या या विशेष सदरात जाणून घेऊया अनिल अंबानी यांच्याविषयी.

Enforcement Directorate (ED) ने गुरुवारी अनिल अंबानींच्या कंपन्यांवर छापे टाकले. त्यांच्यावर मनी लाँडरिंगचा (Money Laundering) आरोप आहे.  तर दुसरी समस्या स्टेट बँकेने निर्माण केली आहे. त्यांनी अनिल अंबानींची कंपनी R COM ला कर्ज फसवणूक म्हणून घोषित केले आहे. आता हे प्रकरण सीबीआयकडे पाठवण्याची तयारी सुरू आहे. दोन्ही प्रकरणे कर्जाच्या गैरवापराशी संबंधित आहेत.

ईडीचं नेमकं प्रकरण काय?

आपण प्रथम ईडीचे प्रकरण समजून घेऊया. अनिल अंबानींच्या कंपन्यांनी YES बँकेकडून 3000 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांच्यावर आरोप आहे की, ज्या कामासाठी त्यांनी कर्ज घेतले होते ते काम करण्याऐवजी, त्यातील एक भाग बनावट करारांद्वारे शेल कंपन्यांना पाठवण्यात आले. या कंपन्यांनी पुन्हा पैसे अनिल अंबानींच्या कंपन्यांना पाठवले. कंपन्यांनी हे पैसे जुने कर्ज फेडण्यासाठी वापरले. कर्जाचे पैसे वळवून जुने कर्ज फेडण्यात आले. याशिवाय कर्जाच्या बदल्यात YES बँकेच्या अधिकाऱ्यांना लाच देण्यात आली. ही लाच Shell कंपन्यांनी दिली.

स्टेट बँकेचं प्रकरण काय?

स्टेट बँकेचेही असेच प्रकरण आहे. R COM ला 2200 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. हे कर्ज इकडे तिकडे वळवून जुने कर्ज फेडण्यात आले. प्रत्यक्षात, अनिल अंबानी आपला व्यवसाय वेगाने वाढवण्याच्या प्रयत्नात कर्जाच्या सापळ्यात अडकले आणि त्यातून बाहेर पडू शकले नाहीत. एकामागून एक त्यांच्या कंपन्या बुडू लागल्या. 

हे वाचलं का?

    follow whatsapp