पैसा-पाणी: भारत-पाक तणाव, शेअर बाजाराचं काय होईल?
भारत आणि पाकिस्तानातील तणावाचा नेमका परिणाम शेअर बाजारावर होणार का? असा सवाल गुंतवणूकदारांना पडला आहे. याचविषयी जाणून घ्या पैसा-पाणीच्या विशेष ब्लॉगमध्ये.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारताची अर्थव्यवस्था मजबूत, पण युद्धाचा भडका उडाल्यास आर्थिक भार वाढेल

सरकारी तिजोरीवर ताण येण्याची शक्यता

दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी फारशी चिंता करू नये
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यातच शुक्रवारी (9 मे) शेअर बाजारात घसरण झाली. त्यामुळे सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे की, जर हा तणाव दीर्घकाळ राहिला, तर शेअर बाजारावर त्याचा काय परिणाम होईल?, अर्थव्यवस्थेचं काय होईल? आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत.
युद्धाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम काय असतो?
सर्वसाधारणपणे, युद्धाच्या काळात सरकारचा संरक्षण खर्च वाढतो. त्यामुळे सरकारचं आर्थिक तूट (fiscal deficit) वाढण्याची शक्यता असते आणि महागाईही वाढते.
Moody’s च्या अहवालानुसार, पाकिस्तानशी भारताचा व्यापार अत्यल्प आहे. त्यामुळे भारतावर परिणाम फारसा होणार नाही. उदाहरणार्थ, भारताचे ₹ 100 च्या निर्यातींपैकी फक्त 50 पैशांचा व्यापार पाकिस्तानसोबत होतो.
तरीही, संरक्षण खर्च वाढल्यामुळे सरकारी तिजोरीवर ताण येण्याची शक्यता अहवालात नमूद केली आहे. पण तो ताण इतका मोठा नाही की भारताची अर्थव्यवस्था कोसळेल.