गेल्या 36 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं! अर्थसंकल्प सादर होताना जयंत पाटील गैरहजर, ट्वीट करत सांगितलं कारण

मुंबई तक

Maharashtra Budget 2026 : जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये भावना व्यक्त करताना म्हटले की: "गेल्या 36 वर्षांपासून मी विधानसभेचा सदस्य राहिलो आहे. या संपूर्ण कालावधीत आज पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर होत असताना दुर्दैवाने मी गैरहजर असणार आहे. माझी तब्येत बरी नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी विश्रांती घेत आहे."

ADVERTISEMENT

Maharashtra Budget 2026
Maharashtra Budget 2026
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गेल्या 36 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं!

point

अर्थसंकल्प सादर होताना जयंत पाटील गैरहजर, ट्वीट करत सांगितलं कारण

Maharashtra Budget 2026 , मुंबई : राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जयंत पाटील आज (दि.6) विधिमंडळात अर्थसंकल्प सादर होत असताना उपस्थित राहू शकलेले नाहीत. गेल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत पहिल्यांदाच अर्थसंकल्पावेळी सभागृहात अनुपस्थित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. खुद्द जयंत पाटील यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. ते नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात... 

हेही वाचा : Maharashtra Budget 2026 : 'त्या' शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

काय म्हणाले जयंत पाटील?

जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये भावना व्यक्त करताना म्हटले की: "गेल्या 36 वर्षांपासून मी विधानसभेचा सदस्य राहिलो आहे. या संपूर्ण कालावधीत आज पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर होत असताना दुर्दैवाने मी गैरहजर असणार आहे. माझी तब्येत बरी नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी विश्रांती घेत आहे."

जयंत पाटील हे स्वतः राज्याचे माजी अर्थमंत्री राहिले असून, त्यांनी विक्रमी 10  वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. अशा परिस्थितीत, अर्थसंकल्पावरील चर्चेत त्यांचा अभ्यासपूर्ण सहभाग नेहमीच महत्त्वाचा मानला जातो. मात्र, आजच्या महत्त्वाच्या दिवशी त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp