'महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात अजितदादांचं मोठं योगदान', अजितदादांना श्रद्धांजली वाहत मोदींनी केली भाषणाची सुरुवात, नेमकं काय म्हणाले?
Ajit Pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर देशभरातली नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजित पवार यांच्या अकाली निधनाविषयी शोक व्यक्त केला आहे. नवी दिल्लीतील करिअप्पा स्टेडियममध्ये एनसीसी रॅलीलीतील आपल्या भाषणाला सुरुवात करण्याआधी करताना मोदींनी अजितदादांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात अजितदादांचं मोठं योगदान
अजितदादांना श्रद्धांजली वाहत मोदींनी केली भाषणाची सुरुवात
Ajit Pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर देशभरातली नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजित पवार यांच्या अकाली निधनाविषयी शोक व्यक्त केला आहे. नवी दिल्लीतील करिअप्पा स्टेडियममध्ये एनसीसी रॅलीला संबोधित करताना मोदींनी अजितदादांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हे ही वाचा : 'पप्पा, मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार...', शेवटचा कॉल आठवून पिंकी माळीच्या वडिलांनी हंबरडा फोडला
मोदी काय म्हणाले?
मोदींनी एनसीसी रॅलीदरम्यान आपले भाषण सुरु करण्याआधी अजितदादांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, 'आजचा दिवस आपल्यासाठी मोठं दु:ख घेऊन आला आहे. आज सकाळी महाराष्ट्रात एक दु:खद विमान दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काही सहकाऱ्यांना आपल्याकडून हिरावून घेतले आहे. अजितदादांनी महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात मोठं योगदान दिलं आहे. विशेषत: ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी कायमच पुढं होऊन काम केलं. मी अजित पवार यांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त करतो. तसेच या दुर्घटनेत इतर काही सहकाऱ्यांना आपण गमावले आहे. अशा दु:खद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत.'
हे ही वाचा : अजित पवार यांचं चार्टर विमान उडवणारी शांभवी पाटील कोण? कारकिर्दीची पूर्ण माहिती










