Ajit Pawar Death : 'त्या' एका वस्तूमुळे अजितदादांची बॉडी ओळखता आली, न पाहावणारी दृश्य

मुंबई तक

Ajit Pawar Death Body identified from watch : विमान अपघात इतका भीषण होता की, मृतदेह ओळखणेही कठीण बनले होते. अजित पवार यांचा मृतदेह त्यांच्या हातातील घडाळ्यावरुन ओळखण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. उपस्थितांनी ही घटना कशी घडली? याबाबतची माहिती दिलीये. 

ADVERTISEMENT

Ajit Pawar
Ajit Pawar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

Ajit Pawar Death : 'त्या' एका वस्तूमुळे अजितदादांची बॉडी ओळखता आली

point

न पाहावणारी दृश्य, उपस्थितांनी अंगावर आणणारा प्रसंग

Ajit Pawar Death Body identified from watch : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (दि.28) सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभा घेण्यासाठी बारामतीमध्ये पोहोचणार होते. मात्र, विमान लँड होताना कोसळलं आणि होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेत एकूण 6 जणांनी जीव गमावलाय. विमान अपघात इतका भीषण होता की, मृतदेह ओळखणेही कठीण बनले होते. अजित पवार यांचा मृतदेह त्यांच्या हातातील घडाळ्यावरुन ओळखण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. उपस्थितांनी ही घटना कशी घडली? याबाबतची माहिती दिलीये. अजित पवारांसोबत त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी, एक अटेंडंट तसेच दोन पायलट्स होते. अजित पवारांचे पार्थिव बारामती वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा : Ajit Pawar Death: ‘माझा दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेला…’, CM फडणवीसांना दुःख अनावर

घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिलेने या दुर्घटनेबाबत बोलताना सांगितलं की, पहिल्यांदा आमच्या वरुन हे विमान गेलं. तेव्हा ते चांगलं होतं. त्यानंतर आम्ही गुरांना खायला टाकलं आणि बाहेर आलो. नंतर गेलेलं विमान खालून आलं. ते धावपट्टीवर गेलंचं नाही ते खालं आलं. त्यानंतर त्याचा जागेवर स्फोट झाला. 8 वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान हे घडलं. विमानाचा मोठा स्फोट झाला. आम्ही तिथे पाणी घेऊन गेलो होतो. तिथे मृतदेह साईडला पडले होते. त्याचं डोक आणि बॉडी साईडला पडलेली होती. हे पाहून आम्ही खूप घाबरलो होतो. 

अजित पवारांच्या अकाली मृत्यूनंतर देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना 

दादा गेले!
जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.
माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य 4 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत.  थोड्याच वेळात बारामतीसाठी निघतो आहे, असं फडणवीस म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp