Ajit Pawar Death: ‘माझा दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेला…’, CM फडणवीसांना दुःख अनावर
Ajit Pawar Death : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दु:खद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. खरं म्हणजे श्री अजितदादा पवार महाराष्ट्रातील लोकनेते होते. महाराष्ट्राची काना-कोपऱ्याची माहिती असलेला आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला नेता होता. जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड मोठी आस्था होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
‘माझा दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेला…’,
CM देवेंद्र फडणवीसांना दुःख अनावर
Ajit Pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (दि.28) सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झालाय. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून अजितदादांच्या जाण्याने राज्यातील अनेक नेत्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत. संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. दरम्यान, अजितदादांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या असून त्यांची विमान अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी ट्वीटरवरुन व्यक्त केल्या भावना
"दादा गेले! जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य 4 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत. थोड्याच वेळात बारामतीसाठी निघतो आहे."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दु:खद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. खरं म्हणजे श्री अजितदादा पवार महाराष्ट्रातील लोकनेते होते. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्याची माहिती असलेला आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला नेता होता. जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड मोठी आस्था होती. अजितदादा कोणत्याही परिस्थिती न डगमगता पुढे जाणारे नेते होते. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस कठिण आहे. अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासात ते महत्त्वपूर्ण योगदान देत होते, अशा काळात ते निघून गेले. हे अविश्वसनीय आणि मनाला चटका लावणारं आहे. दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र सोडून गेला.










