नांदेड तिहेरी हत्याकांडाने हादरले, भावाच्या मर्डरचा बदला घेण्यासाठी 2 खून, एकाला रुग्णालयात घुसून केले ठार

मुंबई तक

Nanded Crime News : नांदेड शहरात गँगवॉरमधून झालेल्या तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली असून, एकाची भररस्त्यात तर दोघांची शासकीय रुग्णालयात घुसून हत्या करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Nanded Crime News
Nanded Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

नांदेड तिहेरी हत्याकांडाने हादरले, गँगवॉरमधून दोघांचा मृत्यू

point

एकाला उपचार सुरु असताना रुग्णालयात घुसून केले ठार

Nanded Crime News : नांदेड शहरात गँगवॉरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली असून, या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारी वर्चस्वाच्या वादातून शहरातील ई-स्क्वेअर परिसरात आणि त्यानंतर थेट शासकीय रुग्णालयात रक्ताचा खेळ खेळला गेला. या हिंसक घटनेची सुरुवात शहरातील कॅनाल रोडवर असलेल्या ई-स्क्वेअर परिसरात झाली. येथे काही अज्ञात हल्लेखोरांनी पूर्ववैमनस्यातून अरिजीतसिंग गजानन चव्हाण याच्यावर अचानक हल्ला चढवला. धारदार शस्त्रांनी केलेल्या या भीषण हल्ल्यात 25 वर्षीय अरिजीतसिंग याचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यावेळी अरिजीतसिंग हा आपल्या दोन मित्रांसोबत सिनेमा पाहण्यासाठी आला होता, मात्र हल्लेखोरांनी त्यांना घेराव घालून हे कृत्य केले. या राड्यादरम्यान सय्यद आवेज सय्यद खलील, घनश्याम रेड्डी आणि मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख हे देखील गंभीर जखमी झाले. भररस्त्यात झालेल्या या खुनामुळे परिसरात एकच पळापळ झाली आणि नागरिकांमध्ये दहशतीचे सावट पसरले.

शासकीय रुग्णालयात घुसून दोघांची हत्या

ई-स्क्वेअर परिसरातील हल्ल्यानंतर जखमी झालेल्या सय्यद आवेज सय्यद खलील आणि मोहम्मद अरबाज यांना पोलिसांनी तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, या घटनेचे पडसाद तिथेही उमटले आणि रक्ताचा बदला रक्ताने घेण्याचा प्रयत्न झाला. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अरिजीतसिंगचा भाऊ राजेश चव्हाण हा हातात चाकू घेऊन थेट शासकीय रुग्णालयात शिरला. त्याने अपघात विभागाजवळ उपचार घेत असलेल्या 27 वर्षीय सय्यद आवेज सय्यद खलील आणि 23 वर्षीय मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख यांच्यावर सपासप वार केले. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामुळे रुग्णांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली. या हल्ल्यात दोघेही गंभीररीत्या जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांनी आपले प्राण गमावले. राजेश चव्हाणने आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हे दोन खून केल्याचे प्राथमिकरित्या समोर आले असून, या घटनेमुळे नांदेडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा : 'मित्रांनी प्राध्यापकासोबत अफेअर असल्याच्या अफवा पसरवल्या', डॉक्टर निकिताची काळजाचं पाणी करणारी सुसाईड नोट

पोलीस तपासात गँगवॉरचा अँगल आणि मुख्य आरोपींचा शोध

ही घटना गँगवॉरमधील जुना वाद किंवा वर्चस्वाच्या संघर्षातून घडल्याची दाट शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या हत्येमध्ये शेख शाहरुख उर्फ कबुतर आणि साईलाला हे मुख्य आरोपी असल्याचे समजते असून, त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. तिघांवर एकाच वेळी नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला करण्यात आला असल्याने हल्लेखोरांची संख्या मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेऊन पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली आहे. फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची बारकाईने तपासणी करण्यात येत असून, हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी ई-स्क्वेअर परिसरातील आणि रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोरांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही पूर्ण कारवाई केल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे.

हे वाचलं का?