मुंबईची खबर : लोकलमधील गर्दीपासून मुंबईकरांना दिलासा, रेल्वे प्रशासनाने घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या सविस्तर
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. नेमका निर्णय काय आहे, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : लोकलमधील गर्दीपासून मुंबईकरांना दिलासा
रेल्वे प्रशासनाने घेतला महत्त्वाचा निर्णय
जाणून घ्या सविस्तर
Mumbai News : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने एप्रिल महिन्यापासून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे वाढत्या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेला हा निर्णय नेमका काय आहे, जाणून घेऊया.
लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ
वाढत्या गर्दीमुळे प्रवासाची सुरक्षितता वाढावी यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. आता 15 डब्यांच्या लोकलच्या 17 अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. या वाढलेल्या फेऱ्यांमुळे जवळपास 45 हजारांहून अधिक प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.
हे ही वाचा : नांदेड तिहेरी हत्याकांडाने हादरले, भावाच्या मर्डरचा बदला घेण्यासाठी 2 खून, एकाला रुग्णालयात घुसून केले ठार
या दोन स्थानकांदरम्यान नवीन गाड्या
अंधेरी ते वांद्रे दरम्यान प्रवास करणाऱ्यांनाही रेल्वे प्रशासनाने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन स्थानकांदरम्यान 15 डब्यांच्या दोन नवीन गाड्या जोडण्यात आल्या आहेत. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांची होणारी तारांबळ कमी होण्यास मदत होईल. यामुळे मुंबईकरांना घरी जाण्यासाठी फारशी धावपळ करावी लागणार नाही.
हे ही वाचा : नाशिक हादरले! दिंडोरीत भीषण अपघात, कार विहिरीत कोसळून 6 मुलांसह 9 जणांचा दुर्दैवी अंत
मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित
रेल्वे प्रशासनाने घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा असल्याचे बोलले जात आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होण्यास मदत होईल. अतिरिक्त गाड्यांमुळे मुंबईकरांना सहजपणे प्रवास करता येईल.









