चिपळूणमधील आंब्याच्या बागेत जळालेल्या हाडांमागचं भयानक सत्य समोर, काय आहे मुंबई कनेक्शन? जाणून घ्या सविस्तर

मुंबई तक

चिपळूण तालुक्यातील रामपूर शिवारातील दरीत झाडा-झुडपांमध्ये संशयास्पदरीत्या जळालेले मानवी अवशेष सापडले होते. त्यानंतर अवघ्या 24 तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. यामध्ये पोलिसांना मुंबई कनेक्शनही आढळून आले. नेमकं प्रकरण काय आहे, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Ratnagiri Crime
Ratnagiri Crime
google news

बातम्या हायलाइट

point

चिपळूणमधील आंब्याच्या बागेत जळालेल्या हाडांमागचं भयानक सत्य समोर

point

काय आहे मुंबई कनेक्शन?

point

जाणून घ्या सविस्तर

Ratnagiri Crime, गोकुळ कांबळे : चिपळूण तालुक्यातील रामपूर शिवारातील दरीत झाडा-झुडपांमध्ये संशयास्पदरीत्या जळालेले मानवी अवशेष सापडले होते. त्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत खून व पुरावा नष्ट करण्याचा गंभीर गुन्हा उघडकीस आणत चिपळूण पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शरीराचे अवशेष, हाडांचे तुकडे अंगठी अन्...

28 मार्च रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास रामपूर येथील डॉ. रावराणे यांनी त्यांच्या आंब्याच्या बागेजवळील दरीत काहीतरी संशयास्पद जाळल्याचे आणि त्या ठिकाणी लहान आकाराची हाडे पडलेली असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना दिली. माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, तेथे जळालेल्या स्वरूपातील अवशेष, हाडांचे तुकडे, अंगठी, रिंग व इतर वस्तू आढळून आल्या. 

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अधिक स्टाफ, मोबाईल फॉरेन्सिक पथक घटनास्थळी बोलावून घेतले. यासोबतच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेले, अपर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी आणि पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांना माहिती देण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळ पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले.

जप्त केलेल्या हाडांच्या तुकड्यांबाबत कामथे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेतला असता ती मानवी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाकडे खून आणि पुरावा नष्ट करण्याच्या गंभीर गुन्ह्याच्या दृष्टीने तपास सुरू केला. त्यानुसार चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 88/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०३(१), २३८(ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहिती, स्थानिक पडताळणी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे घटनास्थळाशी संबंधित माहिती गोळा केली. 

हे वाचलं का?