नागपूर : मुलीच्या घरासमोर चकरा का मारतो? अशी विचारणा केल्यामुळे वाद, रागाच्या भरात SRPF कर्मचाऱ्याची हत्या

योगेश पांडे

Nagpur Crime News : नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मातोश्री नगर परिसरात एक थरारक घटना घडली आहे. घराबाहेर वारंवार चकरा मारणाऱ्या एका तरुणाला जाब विचारल्याच्या कारणावरून SRPF कर्मचारी पंकज ठाकूर यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ADVERTISEMENT

 Nagpur Crime News
Nagpur Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर : मुलीच्या घरासमोर चकरा का मारतो? अशी विचारणा केल्यामुळे वाद

point

रागाच्या भरात SRPF कर्मचाऱ्याची हत्या

Nagpur Crime News, नागपूर : नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. घराजवळ संशयास्पदरीत्या वारंवार चकरा मारणाऱ्या युवकाला जाब विचारल्याने उफाळलेल्या रागातून एका एसआरपीएफ  कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मातोश्री नगर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.  पंकज ठाकूर (रा. वानाडोंगरी, मातोश्री नगर) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून ते एसआरपीएफमध्ये  कार्यरत होते.

'वारंवार इथे चकरा का मारतो', असा जाब विचारल्याने वाद 

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात राहणारा आकाश मंडल हा युवक ठाकूर यांच्या मुलीचा पाठलाग करत यांच्या घराजवळ वारंवार चकरा मारत होता. ही बाब मुलीने वडिलांना सांगितल्यानंतर पंकज ठाकूर यांनी त्याला 'वारंवार इथे चकरा का मारतो' अशी विचारणा करत जाब विचारला. त्यानंतर गुरुवारी पुन्हा आरोपी आकाश हा ठाकूर यांचा मुलीशी बोलण्या प्रयत्न करताना दिसला त्यानंतर आरोपी आणि पंकज ठाकूर यांच्यात वाद झाला. आणि काही वेळाने ते तिथून निघून गेले.

हेही वाचा : 'कुणाला सांगितलं तर परीक्षेत नापास करीन..' विद्यार्थ्यांना भीती दाखवून मुख्याध्यापक करायचा लैंगिक शोषण, 'असं' बाहेर आलं प्रकरण

लोखंडी रॉडने हल्ला करत एसआरपीएफ जवानाचा खून 

मात्र थोड्या वेळात आरोपी आकाश  मंडलने त्याचा  भाऊ हर्षित मंडल आणि काही साथीदारांना सोबत घेत घेऊन पंकज ठाकूर यांना गाठत अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. या वेळी ठाकूर यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. या झटापटीदरम्यान आकाश मंडलने लोखंडी रॉडने ठाकूर यांच्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हल्ल्यात ठाकूर यांच्या काही नातेवाईकांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे वाचलं का?