Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाचं सावट, 'या' जिल्ह्यात वादळी वार्यासह घालणार धुमाकूळ
Maharashtra Weather : राज्यात मार्च महिन्याप्रमाणे एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाचं सावट आहे, जाणून घ्या 2 एप्रिल रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात मार्च महिन्याप्रमाणे एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाचं सावट
2 एप्रिल रोजी हवामान विभागाचा एकूण अंदाज
Maharashtra Weather : राज्यात मार्च महिन्यासह आता एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाचं सावट आहे. 2 एप्रिल रोजी हवामान विभागाने राज्यातील 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे 23 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. जाणून घेऊयात 2 एप्रिल 2026 रोजी हवामान विभागाचा एकूण अंदाज.
हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : पुण्यातून बाहेर पडण्यासाठी 3 महत्त्वाच्या महामार्गांवरील टोलचा दर वाढला, नवे दर आले समोर
कोकण
कोकण विभागात मुंबई, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता जारी केली. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला. तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांच्या पावसाचा अंदाज जारी केला आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहराला अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. तसेच काही भागांत पावसासह वेगाने वारे वाहण्याची अधिक शक्यता आहे. तर कोल्हापूरात रिमझिम पाऊस पडेल असा अंदाज आहे. तसेच सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला. तसेच काही विभागात गारपीट होण्याची संभावना आहे.
मराठवाडा
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला.









