कौटुंबिक वादातून सुनेनं सासऱ्याच्या अवघड जागेवर लाथ मारली, एका झटक्यात गेला जीव
crime news : कौटुंबिक वादातून सुनेनं सासऱ्याच्या गुप्तांगावर लाथ मारली, नंतर ते गंभीर जखमी झाले. नंतर उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
संतापलेल्या सुनेनं सासऱ्याच्या अवघड जागी लाथ मारली
उपचारापूर्वीच सासऱ्याचा गेला जीव
Crime News : मध्य प्रदेशातील मौगंज जिल्ह्यात हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून सुनेनं सासऱ्याच्या गुप्तांगावर लाथ मारली, नंतर ते गंभीर जखमी झाले. नंतर उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी 11 वाजता सासरा जगदीश साकेत (वय 75) आणि त्यांच्या पत्नीचा सून पुष्पा साकेतसोबत वाद झाला.
हे ही वाचा : विम्याच्या पैशांसाठी भावानेच भावावर दगडाने हल्ला करत संपवलं, नंतर दुचाकीवरून दिलं फेकून पुढे...
संतापलेल्या सुनेनं सासऱ्याच्या अवघड जागी लाथ मारली
वाद इतका वाढला की, सासऱ्याने सुनेला बेदम मारहाण केली, ज्यात सून संतापली आणि तिने सासऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण केली. या मारहाणीत सुनेनं सासऱ्याच्या गुप्तांगावर लाथ मारली, ज्यात ती गंभीर जखमी झाली. या घटनेनं परिसरात एकच गोंधळ उडाला. काही लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर सून धमकी देत खोलीत गेली होती. या घटनेनंतर सासरे जगदीश साकेत यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या होत्या.
उपचारापूर्वीच सासऱ्याचा गेला जीव
संबंधित घटनेची माहिती मिळताच मोठा मुलगा घरी आणि त्याने वडिलांना एका रुग्णालयात दाखल केले. पण, रुग्णालयात उपचारापूर्वीच वडील जगदीश साकेत यांचं निधन झालं. मृत्यूची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आणि गुन्हा दाखल करून मृतदेह शिवागरात ठेवल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.
हे ही वाचा : Astrology : काही राशीतील लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहिल, तर 'या' लोकांना सरप्राइज मिळण्याची शक्यता
घडलेल्या घटनेनुसार, आरोपी सून पुष्पा साकेत तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यावरून तिने सासरच्या मंडळींशी अनेकदा वाद घातला. सोमवरी हा वाद पेटला आणि सासू विरुद्ध सून यांच्यात बिनसलं. सून पुष्पा ही सासूचा व्हिडिओ काढत होती, यादरम्यान सासऱ्याने मध्यस्ती केली असता, सुनेनं सासऱ्याच्या गुप्तांगावर लाथ मारली. या प्रकरणात सून पुष्पा साकेतला अटक करण्यात आली आहे.









