मुंबईची खबर : उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याला जाणाऱ्या मुंबईकरांसाठी खुशखबर, मध्य रेल्वेने सुरु केलीये स्पेशल ट्रेन; असे आहे वेळापत्रक
कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गोव्याला जाण्यासाठी खास ट्रेन सुरु केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याला जाणाऱ्या मुंबईकरांसाठी खुशखबर
मध्य रेल्वेने सुरु केलीये स्पेशल ट्रेन
असे आहे वेळापत्रक
Mumbai News : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुंबईकरांना कोकणात आणि गोव्याला फिरायला जाण्याचे वेध लागतात. त्यामुळे आगामी सुट्ट्यांचा हंगाम आणि गाड्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. पर्यकांसाठी खास 'हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस' जाहीर करण्यात आली आहे. 5 एप्रिलपासून ही विशेष ट्रेन रुळावर धावणार आहे. आठवड्यातून एकदा चालवल्या जाणाऱ्या या विशेष फेरीमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार आहे.
असे असेल वेळापत्रक
या विशेष ट्रेनचे वेळापत्रक प्रवाशांच्या सोयीनुसार निश्चित करण्यात आले आहे. गाडी क्र. 0119 (डाऊन) लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) वरून दर रविवारी मध्यरात्री 12:55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी, गाडी क्र. 01120 (अप) मडगाव स्थानकावरून दर शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3:30 वाजता मुंबईत (LTT) दाखल होईल. या वेळापत्रकामुळे नोकरदार आणि पर्यटकांना त्यांच्या सहलीचे नियोजन करणे सोपे जाणार आहे.
हे ही वाचा : नांदेडमधील 'तलवार बाबा'ला पोलिसांनी उचललं, महिला अन् लहान मुलांना कसं गंडवायचा? कारनामे उघड
याठिकाणी असेल थांबा
प्रवाशांच्या सुविधेसाठी ही गाडी कोकणातील आणि गोव्यातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा घेणार आहे. यामध्ये ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि करमाळी या स्थानकांचा समावेश आहे. या प्रमुख थांब्यांमुळे कोकणातील विविध भागांत जाणाऱ्या प्रवाशांना मोठा आधार मिळणार असून, रेल्वेच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
हे ही वाचा : Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! BSNL मध्ये इंजिनिअर्ससाठी मोठी संधी; जाणून घ्या सविस्तर
डब्यांची रचना कशी असले?
प्रवासाचा अनुभव सुखकर व्हावा यासाठी या ट्रेनमध्ये डब्यांची रचना अतिशय उत्तम ठेवण्यात आली आहे. या विशेष गाडीला एकूण 20 डबे जोडण्यात आले असून, यामध्ये 2 एसी टू टियर, 8 एसी थ्री टियर, 4 स्लीपर कोच आणि 6 जनरल कोचचा समावेश आहे. तसेच सुरक्षेसाठी 2 जनरेटर कार देखील असणार आहेत. सर्व स्तरांतील प्रवाशांचा विचार करून ही कोच रचना करण्यात आल्याने ऐन उन्हाळ्यात प्रवाशांचा प्रवास थंडगार आणि आरामदायी होणार आहे.









