रूपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल्स, अंजली दमानियांनी CDR ची कॉपी काढली; सनसनाटी आरोप

मुंबई तक

Anjali Damania on Rupali Chakankar : "रूपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल खरातला झाले आहे. तर त्यांची बहीण प्रतिभा ताकड तर यांचे 236 कॉल आहेत तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे सतरा कॉल आहेत. एकनाथ शिंदे यांचे सर्वात जास्त संभाषण 21 मिनिटांचे आहेत", असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय.

ADVERTISEMENT

Anjali Damania on Rupali Chakankar,
Anjali Damania on Rupali Chakankar,
google news

बातम्या हायलाइट

point

रूपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल्स

point

अंजली दमानियांनी CDR ची कॉपी काढली; सनसनाटी आरोप

Anjali Damania on Rupali Chakankar, मुंबई : "रुपाली चाकणकर यांनी भोंदूबाबा अशोक खरात याला 177 वेळा कॉल केला होता, तर चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचे अशोक खरातला तब्बल 236 कॉल्स झाले", असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. त्या मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होत्या. अंजली दमानिया यांनी भोंदूबाबा अशोक खरात याच्या 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या कालावधीतील सीडीआर (CDR) काढले असल्याचा दावा करत अतिशय गंभीर आरोप केले आहेत.

अनेक संस्था अशी माहिती पुढे आणत असतात , पण सर्वसामान्य जनतेपुढे पण ती माहिती यायला हवी म्हणून मी हे सर्व काही सांगत आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अशोक खरात यांच्याशी त्यांच्या वैयक्तिक मोबाईलवरून 17 वेळा संपर्क साधला असून, यात 10 इनकमिंग आणि 7 आऊटगोइंग कॉल्सचा समावेश आहे. या दोन्ही व्यक्तींमध्ये साधारण 21 मिनिटे चर्चा झाली असून याशिवाय भाजप नेते चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आणि मंत्री आशिष शेलार यांचा 1 कॉल झाल्याचा दावाही दमानिया यांनी केला आहे. खरात यांच्या सीडीआरमधील या धक्कादायक तपशीलामुळे राजकीय क्षेत्रात सध्या विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा : 'मित्रांनी प्राध्यापकासोबत अफेअर असल्याच्या अफवा पसरवल्या', डॉक्टर निकिताची काळजाचं पाणी करणारी सुसाईड नोट

सुषमा अंधारे सीडीआर बाबत काय म्हणाल्या? 

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, रूपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल खरातला झाले आहे  तर त्यांची बहीण प्रतिभा ताकड तर यांचे 236 कॉल आहेत.  तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे सतरा कॉल आहेत. एकनाथ शिंदे यांचे सर्वात जास्त संभाषण 21 मिनिटांचे  आहेत. अनेक माहिती या संस्था पुढे येत  असतात असतात पण सर्वसामान्य जनतेपुढे पण ती माहिती यायला हवी म्हणून मी हे सर्व काही सांगत आहे. अशा व्यक्तीसोबत एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल झाले आहेत (10 इनकमिंग आणि 7 आऊटगोईंग) तर ते कशा संदर्भात झाले आहेत ते त्यांनी सांगणं गरजेचं आहे. चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे यांचे प्रत्येकी आठ कॉल आहेत.  हे सगळे नॉर्मल कॉल आहेत व्हाट्सअप बद्दल माहिती नाही. व्हाट्सअप ची माहिती मिळत नसते. आता समजा पाहायला गेलं तर सर्वाधिक संपर्क कोणासोबत झाला आहे तर तो कुटुंबातील सदस्या होळी सोबत आहे आणि त्यानंतर रूपाली चाकणकर यांच्यासोबत आहे. 33 हजार पेक्षा जास्त सेकंड रूपाली चाकणकर यांच्यासोबत सोबत बोलणं झालं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

हे वाचलं का?