थेट अशोक खरातचा मोबाइल CDR आला बाहेर, एकनाथ शिंदेंनी 'एवढ्या' वेळा केलेला कॉल
सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी अशोक खरातच्या मोबाइल सीडीआरबाबत मोठा दावा केला. ज्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंनी 17 वेळा अशोक खरातला कॉल केला असल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर दररोज नवनवे आणि धक्कादायक असे खुलासे होत आहेत. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याच प्रकरणी एक नवा आणि हादरवून टाकणारा गौप्यस्फोट केला. यावेळी अंजली दमानिया यांनी थेट अशोक खरातच्या मोबाइलचा CDR म्हणजेच कॉल डेटा रेकॉर्ड बाहेर काढला आहे. यामध्ये दमानियांनी असा दावा केला आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल 17 वेळा खरातला कॉल केला होता. त्यामुळे खरात प्रकरणात आता एकनाथ शिंदेनी देखील राजकीयदृष्ट्या अडचणीत आले आहेत.
नेमकं काय म्हणाल्या अंजली दमानिया..
'कुठल्याही विषयावर लढायला लागल्यावर माझ्याकडे बरीचशी माहिती येते. तसाच काहीसा प्रकार आता झाला आहे. अशोक खरातचं प्रकरण महाराष्ट्रात सुरू आहे. त्याची बरीचशी माहिती माझ्यापर्यंत येते आहे आणि ती माध्यमांपर्यंत देते आहे. पण काही कारणामुळे मी चंदीगड येथे आले आहे एका लग्नासाठी. रविवारपर्यंत मी परत येणार नव्हते म्हणून मला वाटलं की, मी ही माहिती लोकांपर्यंत पोहचवावी..'
अशोक खरातला रुपाली चाकणकरांचे तब्बल 177 कॉल्स
'मला एक सीडीआरची कॉपी आली. ती व्हॉट्सअॅपवर माझ्याकडे ज्यांनी पाठवली त्यांना मी ओळखत नाही. आताच्या घटकेला जेव्हा ही माहिती आली तेव्हा तात्काळ, मी ती पोलीस महासंचालक महाराष्ट्र, मुख्यमंत्र्यांना दिली आणि एसआयटीच्या तेजस्वी सातपुते यांच्याकडे परवाच पाठवली. काल दिवसभरात जी माहिती होती ती मी थोडीशी संकलित केली. आताच्या घटकेला माझ्याकडे जी धक्कादायक माहिती आहे ती अशी आहे की, रुपाली चाकणकर म्हणायच्या की, 'अशोक खरात माझे गुरु आहेत. खरातांबाबत मला बाकी काही विशेष माहीत नाही, आमचे फक्त कौटुंबिक संबंध होते वैगरे वैगरे..'
हे ही वाचा>> भोंदूबाबा खरातचं सगळ्यात घाणेरेडं कृत्य, 'शंकराच्या पिंडीजवळ देखील महिलांना घेऊन...', 'ती' गोष्ट ऐकून तुम्हीही जाल हादरून!
'मात्र, आता जी माहिती येते आहे ती अतिशय धक्कादायक आहे. रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातला झाले आहेत. एवढंच नव्हे तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर.. दोन दिवस झाले आपण त्यांच्याबाबत बरंचसं ऐकतो आहोत. त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले आहेत. पण आता मी जे नाव घेणार आहे त्यांचे फक्त आपण फोटो आणि व्हिडिओ बघितले होते.'









